देश-विदेशमहत्वाचे

आता तरी उशीर करू नका! फुकटात आधार अपडेट करा !


भारतीय नागरिकांना केंद्र सरकारनं आणखी एक खूषखबर दिली आहे. आधार कार्डवरील तपशीलात विनामूल्य बदल करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. ही मुदत १४ सप्टेंबरपर्यंत होती.



आता १४ डिसेंबरपर्यंत नागरिकांना कोणतंही शुल्क न भरता आधार कार्ड अपडेट करता येईल.

UIDAI नं या संदर्भात निवदेन प्रसिद्ध केलं आहे. myAadhaar पोर्टलच्या माध्यमातून कागदपत्रे अपलोड करून आधारमधील माहिती विनामूल्य अद्ययावत करता येते. या दुरुस्ती व बदलासाठी १४ सप्टेंबर २०२३ ची मुदत देण्यात आली होती. त्यास नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळं ही सुविधा आणखी ३ महिन्यांनी म्हणजेच, १५ सप्टेंबर २०२३ ते १४ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. https://myadhaar.uidai.gov.in/ या पोर्टलवर १४ डिसेंबर पर्यंत ही सुविधा विनामूल्य उपलब्ध असेल.

खरंतर, दहा वर्षांपूर्वी आधार काढलेल्या नागरिकांनीही आपलं आधार कार्ड अपडेट करावं असं आवाहन UIDAI नं केलं आहे. लोकसंख्येची अचूक माहिती मिळावी म्हणून आधार कार्ड अपडेट करावं. त्यासाठी ओळखपत्राचा पुरावा आणि रहिवासाचा पुरावा अपलोड करावा, असं प्राधिकरणानं म्हटलं आहे.

https://myaadhaar.uidai.gov.in वर आधार फुकटात अपडेट करता येईल आणि ऑफलाइन अपडेटसाठी नेहमीप्रमाणे २५ रुपये आकारलं जाईल.

रहिवासाचा पुरावा मोफत कसा अपलोड कराल?

सर्वप्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा.
लॉगिन करा आणि ‘अपडेट नाव/लिंग/जन्म आणि पत्ता’ निवडा.
‘अपडेट आधार ऑनलाइन’ वर क्लिक करा.
डेमोग्राफिक ऑप्शन अ‍ॅड्रेसच्या लिस्टमधून ‘पत्ता’ निवडा आणि ‘आधार अपडेट करण्यासाठी पुढे जा’ यावर क्लिक करा.
स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि आवश्यक आकडेवारी भरा.
२५ रुपये भरा. (१४ डिसेंबरपर्यंत भरण्याची गरज नाही)
सेवा विनंती क्रमांक (SRN) जनरेट होईल. आधार कार्ड अपडेटची स्थिती जाणून घेण्यासाठी हा नंबर जपून ठेवा. तुम्ही अपलोड केलेल्या माहितीची तपासणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला एसएमएस मिळेल.
आधार नोंदणी किंवा अपडेटची स्थिती, पीव्हीसी कार्डची स्थिती जाणून घेण्यासाठी किंवा एसएमएसद्वारे माहिती मिळविण्यासाठी UIDAI टोल-फ्री नंबर १९४७ वर कॉल करता येईल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button