कुटुंबीयांचा लग्नाला विरोध; अल्पवयीन मुलीने प्रियकरासह केली आत्महत्या, सोलापूर शहरातील घटना

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

कुटुंबीयांनी लग्नाला विरोध केल्याने एका अल्पवयीन मुलीने प्रियकरासह एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोलापुरातील कवठे गावाच्या शिवारात घडली आहे. सोलापूर) व सूरज कुंडलिक चव्हाण (रा. खुनेश्वर, ता. मोहोळ) अशी मृत प्रेमी युगुलाची नावे आहेत.

लक्ष्मी तांबे ही 11 वीत शिकणारी मुलगी वर्षभरापूर्वी मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर येथे नातेवाईकाकडे आली होती. गावात असताना सूरजबरोबर तिची ओळख झाली. तो एका कंपनीत कामाला होता. या दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे समजताच कुटुंबीयांनी लक्ष्मीला पुन्हा सोलापुरात आणले; परंतु दोघांनी आणा-भाका घेत लग्नाचा निश्चय केला होता.

या दोघांच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध होता. लक्ष्मी शुक्रवारी कॉलेजला म्हणून गेली; परंतु रात्री उशिरापर्यंत न आल्याने शोधाशोध सुरू झाली. दरम्यान, शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कवठे गावच्या शिवारात एका झाडाला दोघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.