ताज्या बातम्या

पुन्हा एक ‘लव्ह जिहाद’ प्रकरण , मुस्लिम तरुणाने हिंदू भासवत फसवले


हरिद्वारमधल्या एका घटस्फोटित हिंदू महिलेला मुस्लिम तरुणाने त्याची धार्मिक ओळख लपवून जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप केला आहे  पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हि घटना हरिद्वारच्या लक्सर भागातल्या पठारी या पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. या महिलेने सांगितले की, भगवनपूर भागातल्या एका गावात तिचे लग्न झाले होते. तिला दोन मुलगे पण आहेत. पतीसोबतच्या घरगुती वादामुळे ती पठारी परिसरातील आपल्या गावी माहेरी राहत होती.काही दिवसांपूर्वी जत बहादरपार येथे सचिन नामक व्यक्तीला ती भेटली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ज्वालापूर हरीलोक कॉलनीतल्या एका मौलवींकडे नेल्याचा आरोप तिने या व्यक्तीवर केला आहे. त्या मौलवीसमोर त्याने त्याचे खरे नाव उघड करून जबरदस्तीने धर्मांतर करायला लावले. त्याबरोबरच आपल्या चार वर्षांच्या मुलांचेही धर्मांतर जबरदस्तीने केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. त्याने तिचे मूळ नाव बदलून रेश्मा आणि मुलाचे अरमान अली असे ठेवले आहे. त्यानंतर जबरदस्तीने निकाह करून घरी घेऊन गेला.

पुढे तिने असेही सांगितले कि, तो रोज तिला मारपीट करून जबरदस्तीने मास खायला घालत होता. त्या महिलेने सांगितले कि याने आणि त्याच्या वडिलांनी आम्हाला जबरदस्तीने नमाज पढायला पण सांगण्यात आले होते. त्यासाठी ते आम्हाला मारपीट पण करत असत. काही दिवसांपूर्वी त्याने तिला भरपूर मारहाण करून पाथरी गावात सोडून दिल्याचा गंभीर आरोप या महिलेने केला आहे. ती महिला ज्या भाड्याच्या घरात राहत होती त्या घरमालकाला आरोपी धमकावत असायचा. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु असून स्टेशन प्रभारी निरीक्षक पवन डिमरी यांनी सांगितले. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून आरोपीवर योग्य कारवाई करण्यात येणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button