4500 वर्षांपूर्वीच्या सुमेरियन मंदिराचा शोध

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


लंडन : आग्नेय इराकमध्ये पुरातत्त्व संशोधकांनी 4500 वर्षांपूर्वीचे सुमेरियन संस्कृतीमधील एका भव्य मंदिराचे अवशेष शोधले आहेत. गिर्सू या प्राचीन शहराच्या मध्यभागी हे मंदिर होते.
वसंत ऋतुमधील मेघगर्जनेच्या ‘निंगिर्सू’ या देवतेला समर्पित असे हे मंदिर होते. ब्रिटिश म्युझियमने याबाबतची माहिती दिली आहे.

मातीच्या विटांचा वापर करून हे मंदिर उभे करण्यात आले होते. गिर्सू या प्राचीन शहरातील हे एक महत्त्वाचे व मध्यवर्ती ठिकाण होते. आता हे शहर टेल्लो या पुरातत्त्व साईटमध्ये येते. प्राचीन मेसोपोटामियातील हे एक महत्त्वाचे ठिकाण होते व त्याबाबतचे उत्खनन अजून सुरूच आहे, अशी माहिती लंडनच्या ब्रिटिश म्युझियममधील मेसोपोटामिया संस्कृतीबाबतचे तज्ज्ञ आणि प्रमुख पुरातत्त्व संशोधक सेबास्टियन रे यांनी दिली.

तैग्रिस आणि युफ-ेटिस या नद्यांच्या दरम्यान असलेल्या मेसोपोटामियामधील गिर्सू हे एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र होते. तेथील या मंदिरामध्ये मेघगर्जनेची देवता असलेल्या ‘निंगिर्सू’ या देवतेची मूर्ती ठेवण्यात आली होती. ही देवताच मेघगर्जना, पावसाची वादळे आणि पुरासारख्या नैसर्गिक गोष्टींवर नियंत्रण ठेवते, असे प्राचीन सुमेरियन लोक मानत होते.