हृदयद्रावक! पतीच्या निधनानंतर पत्नीनेही सोडला प्राण; मुले झाली पोरकी…

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


अहमदाबाद (गुजरात): पतीच्या निधनाची बातमी समजताच पत्नीचा अर्ध्या तासातच मृत्यू झाल्याची हृदद्रावक घटना घडल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. नवसारीमधील खेरगाम येथील तोरवनवेरा गावात ही घटना घडली आहे. एका अपघातात अरुण गावित (वय ३८) यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूची माहिती समजताच अरुणची पत्नी भावना या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण, त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. भावना यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला, असे डॉक्टरांनी सांगितले. पतीचा मृत्यू झाल्याचा धक्का बसल्याने अवघ्या अर्ध्या तासात पत्नीचाही मृत्यू झाला. या जोडप्याला दोन मुले आहेत. पती-पत्नीच्या मृत्यूमुळे दोन्ही मुलांवरून आई-वडिलांचं छत्र हरपले आहे. मृत भावना गावित खेरगामच्या माजी सरपंच होत्या.

अरुण गावित यांचा गुरुवारी रात्री गावातच दुचाकी घसरल्याने अपघाती मृत्यू झाला. अरुण गावित यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या पत्नी भावना गावित बेशुद्ध झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले होते. पण, त्यांना बसलेला धक्का इतका तीव्र होता, की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झाले. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर दोन्ही मुले पोरकी झाली आहेत.