ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रमुंबईराजकीय

छत्रपती शिवरायांचा मावळा राज्याचा मुख्यमंत्री, सरकार गड-किल्ल्यांचं संवर्धन करणार


छत्रपती शिवरायांचामावळा राज्याचा मुख्यमंत्री झाला असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.संभाजीराजे छत्रपती आपण केलेल्या सर्व सुचनांची आम्ही दखल घेतली आहे. कोणत्याही शिवभक्तांना शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यापासून रोखता येणार नाही. यावेळी नियोजनात काही त्रुटी राहून गेल्या असतील, यापुढे या त्रुटी राहणार नसल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) आपण सुचना करा, त्याचा विचार करुन अमंलबजावणी केली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

शिवनेरी गडावर राज्याच्या पर्यटन विभागाने महोत्सवाचे आयोजन केलं आहे. अवघा परिसर भगवामय झाला आहे. भगव्याची लाट याठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रत्येकाच्या मना मनामध्ये शिवरायांचा आदर्श आहे. आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

संभाजीराजे आपण केलेल्या सर्व सूचना जनतेच्या हिताच्या आहेत. त्या सर्व सुचनांची आम्ही दखल घेतल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. त्यामुळं आपण जसा रायगडला पुढाकार घेतला. तशाच पद्धतीनं सर्व गडकोट किल्ल्यांवर संवर्धन करण्याचे काम राज्य सरकारचे आहे. संभाजीराजे आपण सूचना करा त्या सूचनांचा विचार करुन अंमलबजावणी केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. वडूज तुळापूरसाठी कधीही निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. नियोजनता काही त्रुटी दूर केल्या जातील. प्रशासनाला तश्या सूचना देण्यात आल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

आमचे सरकार सर्व सामान्यांचे सरकार आहे. या राज्य सरकारने सगळे निर्णय राज्यातील लोकांच्या हिताचे, कष्टकऱ्यांच्या हिताचे घेतले आहेत. सर्व प्रश्नांना न्याय देण्याचे काम सरकारने केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आपण सगळ्यांना सोबत घेऊन पुढे झाणार आहोत. गडकोट किल्ल्यांच्या बाबतीत जे जे आपल्याला करायचे आहे, ते ते आपण करुयात असेही मुख्यमंत्री म्हणाले. शिवरांयाचा ऐतिहासीक ठेवा जपण्याचे काम सरकार करेल. यामध्ये सरकार कुठेही हात आखडता घेणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button