ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

डॉ . काळे अधिष्ठाता ससून रुग्णालय यांची अन्यायकारक बदली रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन


डॉ . काळे अधिष्ठाता ससून रुग्णालय यांची अन्यायकारक बदली रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार
कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांचा इशारापुणे : ( आशोक कुंभार ) डॉक्टर विनायक काळे अधिष्ठाता ससून स्वरूपचार रुग्णालय व ड बि जे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय पुणे यांची नियमबाह्य बदली करण्यात आली आहे ती रद्द करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी दिला आहे .याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक यांना देण्यात आले आहे .याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,डॉ .विनायक काळे अधिष्ठाता बै . जी .वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय ,पुणे येथे अधिष्ठाता या पदावर दि. 30.08.2021 ते 7.04.2022 पर्यंत तात्पुरत्या व 8.04.2022 ते 13.01.2023 पर्यंत नियमीत स्वरूपात कार्यरत होते. या काळात संस्थेचा कारभार सुरळीत विनातक्रार सुरु होता.
परंतु डॉ. विनायक काळे यांना अधिष्ठाता, बै. जी. वै. म. व ससून रुग्णालय, पुणे या पदावरून हटवून त्या ठिकाणी सोलापूरचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना नियुक्ती देऊन केलेला अन्याय दूर करणे आवश्यक आहे .
संदर्भ : 1) डॉ. ठाकूर बदली पुणे शा. आ. क्र. बदली- 1323/ प्र. क्र.-5/23/ वैसेवा-1 दि. 13.01.2023 .
2) डॉ. ठाकूर औरंगाबाद बदली. शा. आ. क्र. आस्थाम- 1220/ प्र. क्र.- 6/ 2020/ वैसेवा-1/ दि. 8.04. 2022.
3) डॉ. ठाकूर औरंगाबाद बदली रद्द, शा आ. आस्थाम- 1220/ प्र. क्र.6/ 2020/ वैसेवा-1 दि. 9.05.2022.
4) डॉ. विनायक काळे बदली शा आ. बदली-1323/ प्र. क्र. 05/ 23/ वैसेवा-1. दि. 13.01.2023.
संदर्भ क्र. 1 नुसार डॉ . काळे यांच्या जागी सोलापूरचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना नियुक्त केले आहे. संदर्भ क्र. 4 नुसार डॉ . काळे यांना अधिष्ठाता पदावरून दूर करून संचालक, महाराष्ट्र मानसिक संस्था, पुणे या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
या अगोदर 31 वर्षांत संचालक-प्राधयापक या पदाचा अतिरिक्त कार्यभार बहुतांशी प्राध्यापक व विभागप्रमुख, मनोविकृती शास्त्र यांनी व काही वेळेस अधिष्ठाता यांनी सांभाळला आहे. डॉ. ठाकूर हे बदलीस पात्र आहेत. परंतू, राज्यभर सोलापूर, धुळे, नंदूरबार, जळगाव,सातारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या 8 ठिकाणी अधिष्ठाता पद रिक्त असूनदेखील डॉ. ठाकूर यांची बदली डॉ .काळे यांच्या जागी केली, हे अन्यायकारक आहे.
संदर्भ क्र. 1 नुसार डॉ. ठाकूर यांना पुणे येथे बदली देण्याकरता डॉ .काळे यांना कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष असतानाही मागासवर्गीय असल्याकारणाने “संचालक-प्राधयापक ” या पदावर बदलीने पाठवून अन्याय केला आहे असे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे ठाम मत आहे. डॉ. ठाकूर सोलापूर येथे कार्यरत असताना त्यांचे गैरकारभाराविरोधातच्या अनेक तक्रारीमुळे त्याची बदली संदर्भ क्र. 3 अन्वये औरंगाबाद येथे झालेली बदली त्यानी रद्द करून घेतली. डॉ . काळे केवळ 9 महिन्यापासून अधिष्ठाता या पदावर कार्यरत आहेत व बदलीस पात्र नाहीत. संचालक-प्राधयापक हे पद भरणे आवश्यक असल्यास, या पदाचे भरती नियम निश्चित करून शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत मानसोपचार विभागप्रमुखामधून हे पद भरणे शक्य आहे. डॉ काळे अधिष्ठाता म्हणून काम पाहत असताना प्रथेनुसार त्यांच्याकडे मानसिक आरोग्य संस्थेचा अतिरिक्त कार्यभार दिला नाही ही विशेष बाब येथ नमूद करावीशी वाटते. यापूर्वीच हा कार्यभार दिला गेला असता तर संदर्भ क्र. 4 च्या शासन आदेशाची गरज भासली नसती. परंतू आता सदर पदावरील नियमित नियुक्तीची निकड, तात्काळ गरज असल्याचा देखावा विनाकारण केवळ डॉ. ठाकूर यांचेकरिता कृत्रिमरित्या निर्माण केला जात आहे. महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेत अशी असाधारण किंवा आणीबाणीची परिस्थिती अजिबात नाही.वरिल सर्व बाबींचे/ मुद्द्यांचे अवलोकन करता डॉ .विनायक काळे यांच्यावर हा घोर अन्याय झाला आहे असे संघटनेचे स्पष्ट मत आहे. त्यांचेवरिल अन्याय दूर करण्यात यावा . सध्या 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात– कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर जीएमसी, नागपूर आय जीएमसी, धुळे, अकोला, चंद्रपूर, मिरज, नांदेड येथे मानसोपचार विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख कार्यरत आहेत. विनाकारण या पदावर डॉ काळे यांना नियुक्ती देवू नये.
डॉक्टर काळे यांची अन्यायकारक बदली त्वरित रद्द करण्यात यावी अन्यथा अन्यायकारक बदली विरुद्ध संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची सर्व जबाबदारी शासनाची राहील याची नोंद घ्यावी .सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी मागासवर्गीय असलेले डॉ .विनायक काळे यांची अन्यकारक बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी केल्याचे गौतम कांबळे यांनी सांगितले .


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button