क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

मुलाचा सांभाळ करतो, अस सांगून लग्नाचे आमिष दाखवून तिला चाकूचा धाक दाखवून बलात्कार..


पुणे : ( आशोक कुंभार )मुलाचा सांभाळ करतो, अस सांगून लग्नाचे आमिष दाखवून तिला चाकूचा धाक दाखवून बलात्कार (Rape) केला. त्यातून झालेल्या मुलाच्या संगोपनासाठी आर्थिक तरतुद म्हणून दिलेले चेक वटले नाही.महिलेला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे याप्रकरणी भाजप-सेनेच्या युती सरकारमध्ये सामाजिक न्याय तथा क्रीडा मंत्री असलेल्या उत्तम प्रकाश खंदारे यांच्यासह इतरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका ३७ वर्षाच्या महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी उत्तम प्रकाश खंदारे (वय ६५, रा. सोलापूर), त्याचे साथीदार महादेव भोसले, बंडु दशरथ गवळी (रा. सोलापूर) यांच्यासह एका महिलेवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

प्रकार बी रेस्ट हाऊस व बिबवेवाडीत २०१२ पासून ते आतापर्यंतच्या काळात घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम खंदारे याने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखविले व फिर्यादीचे मुलाचा सांभाळ करतो, असे भासवले. बी रेस्ट हाऊस येथे फिर्यादीला बोलावले. त्यांना चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी यांनी नकार दिला असता त्या तावडीतून निघून जाऊ नये, म्हणून त्याने फिर्यादीस पूर्ण विवस्त्र केले. पट्याने मारहाण करुन त्यांच्यावर बलात्कार झाला. या बलात्कारातून फिर्यादी या गर्भवती राहिल्या.
त्यांना मुलगा झाला. या मुलाच्या संगोपनासाठी खंदारे याने आर्थिक तरतुद म्हणून चेक दिले. परंतु ते चेक वटले नाही.
तेव्हा त्यांनी ही बाब त्यांना सांगितल्यावर त्याने व इतरांनी फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यामुळे त्यांनी आता जीवाच्या भितीने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button