वारकरी साहित्य परिषदेचा स्वयंघोषीत अध्यक्ष विठ्ठल पाटील याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

वारकरी साहित्य परिषदेचा स्वयंघोषीत अध्यक्ष विठ्ठल पाटील याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी,विश्वकर्मा वंशीय समाजाची मागणी

बीड : ( गेवराई )विश्वकर्मा समाजाचे आद्य संत भोजलींग काका यांच्याबद्दल आर्वाच्च भाषेत बोलुन अवमान केल्याबद्दल विठ्ठल पाटील याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी गेवराई तालुक्यातील विश्वकर्मा समाजाने केली आहे.
सुतार समाजाचे वारकरी संप्रदायाचे आद्य संत भोजलींग काका यांच्याबाबत वारकरी साहित्य परिषदेचा स्वयंघोषीत अध्यक्ष विठ्ठल पाटील राहणार ईमान धामणी तालुका मीरज जि सांगली याने भोजलींग काकांबद्दल
अतिशय खालच्या पातळीवर बोलुन स्वतःचा गाढव पणा सिद्ध करत निर्लज्ज पणाचा कळस गाठलेला आहे, या मुळे विश्वकर्मा समाजामधे संतापजनक वातावरण निर्माण झालेले असून याचे तीव्र पडसाद संपुर्ण महाराष्ट्र भर उमटत आहेत. जर लवकरात लवकर विठ्ठल पाटील याच्यावर कायदेशीर कडक कारवाई केली नाहीतर संपुर्ण राज्यात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल .असा इशारा संघटनेचे प्रदेश सचिव दिलीप सोनवणे यांनी दिला आहे.

या बाबतीत गेवराई तालुक्याचे तहसीलदार यांना विश्वकर्मा वंशीय समाज संटन चे तालुका अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व विश्वकर्मा वंशीय समाज संटन चे सचिव दिलीप सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले , या वेळेस बाबासाहेब सांगुळे, बाळासाहेब गायकवाड,सुनील पोपळे,सुभान भाई, नवनाथ सांगुळे, सुनील सांगळे,रवी पांडे,संतोष गायकवाड, आदिनाथ सांगुळे, गणेश निर्मळ,,रोहीत गायकवाड, किशोर वाघमारे,अरुण पवार, अनिल गायकवाड, बप्पासाहेब गायकवाड यांच्यासह अनेक विश्वकर्मा समाज बांधव उपस्थित होते