शरद पवारांना धक्क्यावर धक्के राष्ट्रवादीचे पाच माजी नगरसेवक आज शिंदे गटात

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

ठाण्यात राष्ट्रवादीला एकनाथ शिंदे यांच्या गटाने खिंडार पाडलं आहे. राष्ट्रवादीचे पाच माजी नगरसेवक आज शिंदे गटात प्रवेश करणार आहे. आज संध्याकाळी हा प्रवेश सोहळा होणार आहे. यामध्ये पवारांना ४६ वर्ष साथ देणारा नेतादेखील आहे.

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे मनपा प्रभाग क्रमांक 6 मधील सर्वच 4 माजी नगरसेवक राष्ट्रवादीला सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता लक्ष्मी पार्क सर्व्हिस रोड येथील होणाऱ्या कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.

मात्र, राजकीय वर्तुळात विशेष चर्चा रंगली आहे ती म्हणजे हणमंत जगदाळे यांची. हणमंत जगदाळे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आहेत. ठाण्यातील अनुभवी आणि जुने नगरसेवक आहेत. त्यांनी ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेतेही होते. 1977 पासून म्हणजे गेल्या 46 वर्षांपासून ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत काम करत आहेत. मात्र, आता त्यांनी पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.