‘कमकुवत मनाच्या लोकांनी व्हिडिओ पाहू नये’, नागालँडच्या मंत्र्याने PM मोदींचा ‘तो’ VIDEO शेअर केला..

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


‘Warning! कमकुवत मनाच्या लोकांनी हा व्हिडिओ पाहू नये. पुन्हा सांगितलं नाही, असं म्हणून नका…’ हा इशारा नगालँडच्या मंत्र्याने दिला आहे. विशेष म्हणजे, हा इशारा दुसरं-तिसरं कुणी नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडिओसाठी देण्यात आला आहे.

छोट्या डोळ्यांवर वक्तव्य करुन देशभरात प्रसिद्ध मिळवणारे नागालँडभाजपाध्यक्ष तेमजेन इम्ना अलोंग यांनी मोदींचे लोकसभेतील भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

 

या व्हिडिओमध्ये पीएम मोदींनी विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यावरून पंतप्रधानांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. यावरुनच नागालँडच्या मंत्र्याने हा व्हिडिओ कमकुवत हृदयाच्या लोकांनी तो पाहू नये असे म्हटले आहे. व्हिडिओमध्ये पीएम मोदींनी श्रीनगरधील राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा उल्लेख केला आहे.

यात्रेदरम्यान राहुल यांनी लाल चौकात तिरंगा फडकावला होता. राहुल यांचे नाव न घेता मोदी म्हणाले, ‘जे नुकतेच जम्मू-काश्मीरमधून परतले आहेत, त्यांनी बघावं की, आता तुम्ही तिथे आरामात जाऊ शकता. मीही लाल चौकात तिरंगा फडकवायलाही गेलो होतो. तेव्हा दहशतवाद्यांनी तिथे एक पोस्टर लिहिलं होतं, बघूया कोण लाल चौकात तिरंगा फडकवत आहे…’

ते पुढे म्हणाले होते, ’24 जानेवारीला मी एका रॅलीत म्हणाले होते, दहशतवाद्यांनो मी 26 जानेवारीला सकाळी 11 वाजता लाल चौकात येणार आहे. सुरक्षेशिवाय आणि बुलेटप्रूफ जॅकेटशिवाय. आईचे दूध प्यायले असाल, तर लाल चौकात या. मी लाल चौकात तिरंगा फडकवला. आज जम्मू-काश्मीरमध्ये शांतता आहे. शेकडो लोक तिथे जाऊ शकतात. जम्मू-काश्मीरने पर्यटनाचे अनेक विक्रम मोडले आहेत. तिथे लोकशाहीचा सण साजरा केला जात आहे. हर घर तिरंगा सारख्या मोहिमेने या केंद्रशासित प्रदेशात यशाचे नवे विक्रम रचले,’ असं मोदी व्हिडिओत म्हणत आहेत.