ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

कोरेगाव भीमात भीषण अपघात; कारच्या धडकेत चार वर्षीय बालिका ठार


कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील डिंग्रजवाडी रस्त्याने आईसोबत पायी चाललेल्या चार वर्षीय बालिकेला कारची धडक बसली. या अपघातात श्रेया भागवत खिल्लारे ही बालिका ठार झाली. शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील डिंग्रजवाडी रस्त्याने आईसोबत पायी चाललेल्या चार वर्षीय बालिकेला कारची धडक बसली. या अपघातात श्रेया भागवत खिल्लारे ही बालिका ठार झाली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे देविदास पांडुरंग चांदगुडे या कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.



कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील डिंग्रजवाडी रस्त्याने शितल खिल्लारे ही महिला तिच्या चार वर्षीय मुलीला घेऊन दूध आणण्यासाठी गेली होती. काही वेळाने दूध घेऊन पुन्हा ढेरंगे वस्ती येथे घरी जात असताना पाठीमागून कार भरधाव वेगाने आली. या दरम्यान कारची धडक बसून आईसोबत पायी चाललेली श्रेया गंभीर जखमी झाली. यावेळी येथील नागरिकांनी जखमी श्रेया हिला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी श्रेया भागवत खिल्लारे (वय ४ वर्षे रा. ढेरंगे वस्ती कोरेगाव भीमा ता. शिरूर जि. पुणे) हिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

याबाबत भागवत प्रभू खिल्लारे (वय 4 वर्षे रा. ढेरंगे वस्ती कोरेगाव भीमा ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी कारचालक देविदास पांडूरंग चांदगुडे (रा. ढेरंगे वस्ती कोरेगाव भीमा ता. शिरूर जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button