क्राईमताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

मातृत्वावरचा विश्वास उडवणारी भयानक घटना,मृतदेह समोर अन महिला प्रियकरासोबत करीत होती शरिरसंबंध..


फेसबुक अकाऊंटवरुन मिळाले धागेदोरे



हे सगळं प्रकरण हायप्रोफाईल होतं. अर्चनाच्या फोनवरुन आणि फेसबुकवरुन पोलिसांना धागेदोरे मिळाले. पोलिसांनी अजय यादवला अटक केली, त्यानं सगळं घडलेलं सांगितलं. अर्चनाला या तिच्या किळसवाण्या कृत्याबाबत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

अर्ध्या रात्री एक व्यक्ती येऊन 4 वर्षांच्या लहानग्याच्या वडिलांची हत्या करतो. घरातल्या गोंधळामुळं गाढ झोपेत असलेल्या 4 वर्षांच्या लहानग्याला जाग येते.वडिलांची हत्या डोळ्यासमोर होताना पाहून तो लहानगा घाबरतो. तेवढ्यात त्याचं लक्ष तिथचं उभ्या असलेल्या आईकडं जातं. तो घाबरलेला मुलगा आईला बिलगतो. आईही त्याला ह्रद्याशी घेते..आणि पुढच्या क्षणी तुम्ही विचारही करु शकणार नाही अशी घटना घडते.

लखनौ : अर्ध्या रात्री एक व्यक्ती येऊन 4 वर्षांच्या लहानग्याच्या वडिलांची हत्या करतो. घरातल्या गोंधळामुळं गाढ झोपेत असलेल्या 4 वर्षांच्या लहानग्याला जाग येते. वडिलांची हत्या डोळ्यासमोर होताना पाहून तो लहानगा घाबरतो. तेवढ्यात त्याचं लक्ष तिथचं उभ्या असलेल्या आईकडं जातं. तो घाबरलेला मुलगा आईला बिलगतो. आईही त्याला ह्रद्याशी घेते..आणि पुढच्या क्षणी तुम्ही विचारही करु शकणार नाही अशी घटना घडते. ही आई आपल्याला बिलगलेल्या मुलाचा गळाच जोरात दाबते. 4 वर्षांचा चिमुरडा तडफडू लागतो. पण त्या कैदाशिणीला त्याचं काहीच वाटत नाही. त्या लहानग्याचा श्वास थांबत नाही, तोपर्यंत ती त्याच्या गळ्यावरचा दाब कमी करत नाही. एकून मातृत्वावरचा विश्वास उडवणारी ही भयानक घटना प्रत्यक्षात घडलेली आहे.

हा सगळा प्रकार घडल्यानंतरही या महिलेला काहीही वाटत नाही. ती मुलगा आणि पती खरचं मेले आहेत की नाहीत, हे तपासते. आपल्या पतीचा आणि मुलाचा मृतदेह एका खोलीत तसाच ठेवून ती प्रियकरासोबत दुसऱ्या खोलीत जाते आणि शरिरसंबंध ठेवते. त्यानंतर अनेत तास ते दोघंही मौजमजा करतात. कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाण्याचा हा प्रकार घडला आहे. या सगळ्या नीच कृत्यानंतर ही महिला एक खोटी घटना तयार करते आणि ती घेऊन सगळ्यांसमोर शहाजोगपणाचा आव आणत समोर येते.

मातृत्व, स्त्रीत्व आणि पत्नीत्व यावरचा विश्वास उडेल अशी ही घटना घडलीय गोरखपूरमध्ये राहणाऱ्या एका उच्चभ्रू कुटुंबात. राक्षसीपणाच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या या महिलेचं नाव आहे अर्चना, जिचं लग्न 2009 साली गोरखपूरमध्ये मुलांवर उपचार करणाऱ्या ओम प्रकाश यांच्याशी झालं होतं. ओम प्रकाश हे मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. लहानपणीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या भावांनी त्यांना शिकवलं आणि डॉक्टर केलं.

मृत ओमप्रकाश यांचं पहिलं लग्न 2008 साली सिंगापूरमध्ये राहणाऱ्या मूळच्या एका गोरखपूरमधील कुटुंबातील एका मुलीशी करण्यात आलं. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. त्यानंतर पुन्हा ओमप्रकाश यांच्यासाठी मुलगी शोधण्यात आली. त्यानंतर लखनौत राहणाऱ्या अर्चनाशी त्यांचा दुसरा विवाह झाला. अर्चनाचे वडील हे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सुरक्षेत तैनात होते. लखनौतील मोठ्या परिवारात त्यांच्या नावाचा समावेश होत असे.

लग्न झाल्यानंतर काही काळ अर्चना ओमप्रकाश यांच्यासोबत एकत्र कुटुंबात राहिली, नंतर मात्र तिनं स्वतंत्र राहण्यासाठी हट्ट धरला. इच्छा नसतानाही डॉक्टरांना हा निर्णय घ्यावा लागला. त्याच घरात वरच्या मजल्यावर हे दोघं वेगळे राहू लागले. ओम आणि अर्चना यांना एक मुलगा झाला. तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. त्यानंतर मात्र या दोघांत भांडणांना सुरुवात झाली. अर्चना नेहमी फोनमध्ये बिझी असे. मुलाकडे तिचं दुर्लक्ष होत होतं. घरातली काम करायचीही तिनं बंद केलं. डॉक्टर ओम य़ांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही.

दरम्यानच्या काळात अर्चनाची ओळख फेसबुकवर फिरोजाबादच्या अजय यादवशी झाली होती. ते दोघेही तासोनतास फोनवर बोलत. अजय फिरोजाबादमध्ये खासगी शाळेत शिक्षक होता. या दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. ती अजयच्या जवळ गेली, तेवढी तिच्या नवऱ्यापासून लांब. दोघेही वेगवेगळे झोपू लागले. मुलगा ओम यांच्यासोबत झोपत अ्से. या काळात अजय आणि अर्चना एकमेकांना भेटूही लागले. माहेरला जाण्याचं खोटं कारण अर्चना त्यासाठी सांगत असे. लखनौला ते भेटत सेक्स करीत आणि ती परत गोरखपूरला परतत असे. असंच अनेक दिवस चाललं होतं.

20 जानेवारी 2016 रोजी काय घडलं?

या दिवशी रात्री शेजारच्यांकडे एक कार्यक्रम होता. तिथं मुलासोबत जाण्याचा डॉक्टर ओम यांचा विचार होता. मात्र अर्चनाने सोबत येण्यास नकार दिला. तिच्या डोक्यात वेगळंच शिजत होतं. ती तिच्या आणि अजयच्या रस्त्यातून पतीला आणि मुलाला दूर करण्याच्या प्रयत्नात होती. तिने रात्री अजयला घरी बोलावलं. त्यांनी हत्येचा प्लॅन केला आणि तिच्या खोलीत अजय रात्रभर लपून बसला. कार्यक्रमावरुन ओम आणि मुलगा परतले आणि झोपले.

पहिल्यांदा पतीला मारलं मग मुलाला

अर्ध्या रात्री अर्चना अजयसोबत ओम आणि मुलगा झोपलेल्या खोलीत आली. अजयनं हातोड्यानं ओम यांच्या डोक्यावर वार केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. घाबरलेला मुलगा आईला बिलगला. त्यावेळी अर्चनानं मुलालाही मारुन टाक असं प्रियकराला सांगितलं. त्यावर अजयनं नकार दिला. त्यावर ठिकाय मीच त्याला मारते, असं म्हणत तिनं त्याचाही गळा आवळला. त्यात त्याचाही मृत्यू झाला.

हत्येनंतर बॉयफ्रेंडसोबत केला सेक्स

मुलाला आणि पतीला मारल्यानंतर या दोघांनी पुन्हा सेक्स केला. त्यानंतर घरातील सामान विस्कटून टाकलं. घरात चोरी दाखवायचा त्यांचा प्लॅन होता. ठरल्याप्रमाणे अजय अर्चनाला तिच्या खोलीत कोंडून पळून गेला. सकाळी जेव्हा कुटुंबातील इतर लोकं घरात आले तेव्हा अर्चना खोलीत बंद होती आणि बाहेर या दोघांचे मृतदेह पडलेले होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button