दिंद्रुड येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक आण्णासाहेब खोडेवाड यांची यश इंटरनॅशनल (सी बी.एस ई) स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला सदिच्छा भेट व सत्कार

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


दिंद्रुड येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक आण्णासाहेब खोडेवाड यांची यश इंटरनॅशनल (सी बी.एस ई) स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला सदिच्छा भेट व सत्कार

 

दिंद्रुड (प्रतिनिधी) :- दिंद्रुड पोलीस स्टेशनचे नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी आण्णासाहेब खोडेवाड यांनी यश इंटरनॅशनल (सी बी.एस ई) स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला सदिच्छा भेट दिली असता त्यांचा शाळेच्या वतीने फेटा बांधून व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. श्री. खोटेवाड सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील असे ते म्हणाले.
दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या नुतन सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी आण्णासाहेब खोडेवाड यांची नियुक्ती व पदभार नुकताच स्वीकारला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी आण्णासाहेब खोडेवाड यांनी यश इंटरनॅशनल (सी बी.एस ई) स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला सदिच्छा भेट दिली असता त्याचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी आण्णासाहेब खोडेवाड म्हणाले की, पोलिस सेवेत काम करीत असतांना समाजाची सेवा करण्याची संधी मला मिळाली. यापुढेही आपण शासकीय कामाबरोबर लोकांच्या प्रश्‍नांसाठी झटू व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील असे ते म्हणाले. यावेळी कै.रामभाऊ अण्णा खाडे सेवाभावी संस्थेचे संचालक विलास शिवाजीराव खाडे सर व यश इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक लटपटे सर, कांदे सर ,पोपळे सर व अंगरक्षक गणेश खाडे, माऊली खाडे, योगीराज खाडे, लक्ष्मण खाडे, परशुराम कांदे व मित्र मंडळी उपस्थित होते.