Video:MSEB अधिकारी वीज तोडायला शेतात आले; मराठी शेतकऱ्याने इंग्रजीत झापलं

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

सांगली : वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या वीज महामंडळाच्या अधिकाऱ्याशी शेतकऱ्याने चक्क इंग्रजीतून संवाद साधला आहे. सांगली तालुक्यातील आटपाडी येथील ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

वेताळ चव्हाण असं या शेतकऱ्याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, महावितरण विभागाने शेतीसाठी असलेल्या लाईटची चोरी रोखण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तर अभियंता सुनील पवार हे आटपाडी तालुक्यातील य.पा.वाडी येथे तपासणीसाठी आले असता शेतकरी वेताळ चव्हाण यांनी त्यांच्याशी इंग्रजीतून संवाद साधला आहे. हा व्हिडिओ महावितरण अधिकाऱ्याने शूट केला आहे.

व्हिडिओमध्ये शेतकरी आपली बाजू चांगल्या पद्धतीने अधिकाऱ्यासमोर मांडताना दिसत आहेत. “मी अनेकवेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी केली पण साहेब माझे ऐकून घेत नाहीत” असं शेतकरी इंग्रजीतून बोलताना दिसत आहे. तर हा व्हिडिओ पाहून आपणही थक्क व्हाल. या आजोबांची कमालंच आहे असं मत अनेक युजर्सने व्यक्त केलं आहे.