
बीड तालुक्यातील मौजे. लिंबागणेश येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत त्यागमुर्ती रमाई आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक आगम एस. बी.तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना सहशिक्षक अमर पुरी यांनी केली तर आभार प्रदर्शन श्रीमती कदम एस.एन.यांनी केले यावेळी सहशिक्षक चव्हाण, चौरे बीड.बी.,श्रीमती एम.बी. कुलकर्णी उपस्थित होते.यावेळी इयत्ता ४ थी मधील विद्यार्थीनी स्नेहल बन्सी निर्मळ हीने रमाईच्या निष्ठा, त्याग व कष्टप्रद जीवनामुळे बाबासाहेब परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकले, दलितांच्या, अस्पृश्यांच्या उद्धारासाठी बाबासासेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या त्यांच्या त्यागमय
जीवन कार्याची माहिती छोटेखानी भाषणातून िदली