क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी


इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेने मंगळवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे.

मुंबई : मुंबईमध्ये धमकीचे सत्र सुरूच आहे. आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्फोटाने उडवून देणार अशी धमकी देण्यात आली आहे. इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या नावाने धमकी देण्यात आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास एका व्यक्तीने मुंबई विमानतळावर फोन करून धमकी दिली. विमानतळ स्फोटकाने उडवून टाकू अशी धमकी या माथेफिरूने दिली. फोन करणाऱ्या व्यक्तीने इरफान अहमद शेख असं आपलं नाव सांगितलं आहे

तो स्वत: ला इंडियन मुजाहिद्दीन नावाच्या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचं सांगत आहे.

फोनवर धमकी दिल्यानंतर त्याने तो कोडवर्डमध्ये बोलत होता. त्यानंतर विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती मुंबई पोलिसांना दिली.



पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवली असून सर्व तपास यंत्रणांना यााची माहिती दिली आहे. विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सहारा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात IPC कलम 505(1) नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button