क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबई

माझा पती मुलींसारखा…’, पत्नीचा धक्कादायक खुलासा


मुंबई : मुंबईमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका पत्नीने तिच्या पतीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. घाटकोपरला राहणाऱ्या या महिलेने सांगितलं की, 2021 मध्ये कोल्हापूरला राहणाऱ्या एका तरूणासोबत तिचं लग्न झालं होतं.
त्याच्या परिवाराने धुमधडाक्यात त्याचं लग्न केलं. पण लग्नाचा आणि सुखी संसाराचा हा आनंद फार काळ टिकला नाही. आता महिलेने आरोप केला आहे की, तिचा पती महिलांसारखा मेकअप करतो.मिड डे च्या एका वृत्तानुसार, महिलेचा आरोप आहे की, एका रात्री तिने पाहिलं की, तिच्या पतीने नवरीसारखी साडी नेसली, इतकंच नाही तर त्याने नवरीसारखं मेकअप केलं. ही साडी महिलेने लग्नात घेतली होती. रात्री तो तसाच झोपला. दुसऱ्या दिवशी तिने ही घटना सासूला सांगितली तर सासू म्हणाली की, ही त्याची जुनी सवय आहे.

महिलेचा आरोप आहे की, याबाबत तिने तिच्या माहेरच्या लोकांना सांगितलं. जेव्हा हे पती आणि सासरच्या लोकांना समजलं तेव्हा त्यांनी तिला त्रास देणं सुरू केलं. महिला म्हणाली की, सासरच्या लोकांनी पतीच्या वागण्यावर पडदा टाकण्यासाठी ती प्रेग्नेंट असल्याची अफवा पसरवली. नंतर असंही सांगण्यात आलं की, काळजी न घेतल्यामुळे तिचा गर्भपात झाला. जेव्हा तिने याबाबत पतीकडे तक्रार केली तर तिला मारहाण करण्यात आली.

महिला म्हणाली की, माहेरी काही दिवस राहिल्यानंतर ती कोल्हापूरला परत आली. पीडितेचा आरोप आहे की, सासरी आल्यानंतर तिने सदर बाजार पोलिसांना संपर्क केला. पण तिची कोणतीही तक्रार लिहून घेण्यात आली नाही. कारण सासरचे लोक खूप श्रीमंत आहेत. तेच पीडितेच्या परिवाराने सांगितलं की, त्यांच्या मुलीला त्रास देण्यात आला आहे. आरोपींना कठोर शिक्षा मिळली पाहिजे. ते म्हणाले की, आम्ही फार आनंदाने आमच्या मुलीचं लग्न केलं होतं. आम्ही मुलालाही भेटलो होतो. पण त्यावेळी काही संशयास्पद वाटलं नाही. तेच सासरच्या लोकांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button