मध्यरात्री ‘डोअरबेल’ वाजवून होते गायब! उत्तर प्रदेशमध्ये नग्न महिलेची चर्चा

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


महिला मध्यरात्री नग्न अवस्थेत लोकांच्या घरावरील डोअरबेल वाजवत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकाच्या मनात भिती निर्माण झाली आहे.

 

दरम्यान, हा व्हिडीओ उत्तर प्रदेशाच्या रामपूरमधील असून पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले आहे.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, २९ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये एका महिलेने नग्न अवस्थेत लोकांच्या घरावरील डोअरबेल वाजवल्याचा प्रकार घडला होता. या घटेनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या प्रकरणी स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर रामपूर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला होता.

दरम्यान, पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून ही महिला गेल्या पाच वर्षांपासून मानसिक रोगी असल्याची माहिती रामपूर पोलिसांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी महिलेच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली असून यापुढे असा प्रकार घडणार नाही, याची काळजी घेण्यासंदर्भात निर्देशही पोलिसांनी तिच्या कुटुबियांना दिले आहेत.