क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवत, तीन लाख रुपयांची मागणी


देवगावकर यांची पत्नी मधात आली असता आरोपीने तिला देखील लोटलाट केली. त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली. सबब, देवगावकर यांनी भीतीपोटी आरोपीला ११०० रुपये दिले. त्याचवेळी आरोपीचा तोंडाचा दुपटटा सुटला. त्याच्या डोळ्यावरील चष्म्याची काच खाली पडली. तो पळून गेला.अमरावती : एक वृध्द दाम्पत्य नेहमीप्रमाणे रात्रीच्या भोजनाची तयारी करत असताना घरात शिरलेल्या एकाने त्यांच्यावर खेळण्यातील पिस्टल ताणत त्यांना मारहाण केली. भीतीपोटी त्या वृध्दाने त्याला ११०० रुपये देत स्वत:चा जीव वाचवला.

धक्कादायक घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश कॉलनी येथे २८ जानेवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली.

याप्रकरणी ३० जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. यात विजय शामसुंदर देवगावकर (८२) व त्यांची पत्नी जखमी झाली. देवगावकर दाम्पत्य शनिवारी रात्री घरात असतांना एक अनोळखी इसम तोंडाला दुपटटा बांधून व चष्मा लाऊन त्यांच्या घरात शिरला. घराचे उघडे दार लोटून घरात शिरताक्षणीच मला तीन लाख रुपयांची गरज आहे, तुम्ही मला ३ लाख रुपये दया, असे त्याने दरडावले. त्यावर देवगावकर यांनी नकार दिला, त्यावेळी त्याने आत्महत्येची धमकी दिली. खेळण्यातील पिस्टलचा धाक दाखवला. त्यावर देवगावकर यांनी घरात पैसे नसल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपीने चाकुने धमकावले. या ओढाताढीत तो चाकु त्यांच्या हाताला लागून ते जखमी झाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button