ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रसंपादकीय

लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख इंदिरा कल्याण केंद्राच्या खडकी भुषण पुरस्काराने सन्मानित


लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख इंदिरा कल्याण केंद्राच्या खडकी भुषण पुरस्काराने सन्मानित

पुणे : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त इंदिरा कल्याण केंद्र खडकीच्या वतीने समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना खडकी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
यावेळी सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांना मराठी, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल खडकी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार वितरण समारंभ २६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता खडकी येथील इंदिरा कल्याण केंद्र मैदानात आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार वितरण समारंभात अनेक गनमाण्यांची उपस्थिती होती.
तत्पूर्वी अभिनेत्री मा. वृंदा बाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर ज्येष्ठ रंगकर्मी प्रदीप देवकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले.
दुर्योधन तुकाराम भापकर (उपाध्यक्ष, खडकी छावणी परिषद), बाबा कांबळे, मेहबूब लियाकत शेख, मनिष सुरेंद्र आनंद (उपाध्यक्ष – खडकी छावणी परिषद), प्रदिप हरिशचंद्र जांभळे (पो.नि. दहशतवाद विरोधपथक, राष्ट्रपती पोलिस पदक विजेते) नगरसेविका सौ. पुजा मनिष आनंद, कू. अरिबा अय्यूब शेख (लंन्डन बूक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड), यांना पूरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. चित्रपट आणि टीव्ही सिरीयल अभिनेत्री निशा मोरे, मिस पिसीएमसी ग्लोबल व महाराष्ट्र २०२१, उद्योजिका, अभिनेत्री टिना क्षत्रिय, ॲड. तथा सामाजिक कार्यकर्त्या स्मिता विजय टाकवणे-ढेबे, अभिनेत्री, मॉडेल, मिस हिंदुस्थानी मुंबई २०२२ सना शेख, सौ.स्नेहल जितेश वाल्हेकर (सामाजिक कार्यकर्त्या) अलताफ दादासाहेब शेख (राष्ट्रीय पुरस्कार विजेते, लेखक/ दिग्दर्शक) अभिनेता आनंद बूरूड (मराठी, हिंदी, कन्नड), (prime picture 5 Ott platform technical head) जाकिर हूसेन
Prime picture5 Ott platform technical head रविष कुमार
पत्रकार कलंदर शेख मामू

आदींना खडकी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन इंदिरा कल्याण केंद्राचे अध्यक्ष समीर शब्बीर चौधरी, गणेश देवराम कांबळे, अजहर अहेमद खान, रवि गायकवाड, तनवीर खान, हारुण सय्यद, फिरोज शेख, महेबूब पिरजादे, विजय गायकवाड, आकाश सर्वदे, सईद शेख, लतीफ सत्तार शेख यांनी केले होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button