पुणे : नराधम काकाने मित्रांच्या मदतीने आपल्या दोन सख्ख्या पुतणींवर बलात्कार केला आहे.
पुण्यातील (Pune) भवानी पेठेत ही संताजपक घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार करण्यात आलेल्या दोन्हीही मुली या अल्पवयीन आहेत. याप्रकरणी एका समाजसेविकेने पोलिसांत (Police) तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच, पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे.
इरफान (वय २९ वर्ष) आणि मोहम्मद (वय ४० वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार (Crime News) गेल्या २० ते २२ दिवसांपासून सुरू होता. यातील एका पीडित मुलीचे वय १४ असून दुसऱ्या पीडित मुलीचे वय १० असून त्या दोघी बहिणी आहेत. या दोन्ही मुलींचे आई-वडील काही कामानिमित्त दिल्ली येथे गेले होते.
मुली लहान असल्याकारणाने त्यांनी या दोघींना काकाकडे राहिला पाठवले होते. दरम्यान, घरी असताना काकाने वेळोवेळी या दोन्ही लहान मुलींशी बळजबरी करून शारीरिक संबंध ठेवले. इतक्यावरच हा नराधम थांबला नाही. तर त्याच्या मित्राने सुद्धा या दोन्ही मुलींशी जबरदस्तीने शारीरिक (Relation) संबंध ठेवले. गेल्या तीन आठवड्यांपासून हा प्रकार सुरू असल्याने यातील एका मुलीने पोटात दुखत असल्याने शेजारी राहत असलेल्या लोकांना सांगितलं आणि यातूनच आज सगळा धक्कादायक प्रकार समोर आला.
दरम्यान, हा सगळा प्रकार एका समाजसेविकेने पोलिसांना सांगताच पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपीचा शोध घेतला आणि यातील दोघही जणांना अटक केली आहे. खडक पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात बलात्काराच्या गुन्ह्यासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.