क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

बीड नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न


केज तहसील कार्यालयातील, संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाल्याची थरारक आज दुपारी घडली.

बीड : बीड जिल्ह्यातील केजमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांना भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सरकारी अधिकाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यामुळे केजमध्ये या प्रकरणाची चर्चा होत आहे. कौटुंबिक वादातून आशा वाघ यांच्यावर हल्ला झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही कौटुंबिक वादातून त्यांच्या भावानेच त्यांच्यावर हल्ला केला होता.

केज तहसील कार्यालयातील, संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला झाल्याची थरारक घटना घडली आहे. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आशा वाघ यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातून त्या थोडक्यात बचावल्या असून सध्या त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button