शेतकरी महिलेवर सामूहिक बलात्कार करून केली हत्या

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे येथे महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील सुरेवानी गावात ही घटना घडली आहे. या घटनेत तिन आरोपी सामील होते. या तिघांनी वेळ साधत महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी तातडीने तपास करत या तीनही आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती. पीडिता एकटी असल्याचे पाहून नराधम तिच्याकडे गेले, आणि महिलेकडे शरीरसुखाची मागणी करू लागले मात्र महिलेने विरोध केला असता तिला मारहाण करत तिघांनी सामूहिक बलात्कार केला.

त्यानंतर देखील हे आरोपी थांबले नाहीत त्यांनी महिलेची धारधार कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर ही महिलेवर बलात्कार केल्याचा घृणास्पद प्रकार आरोपींनी केला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये संतापाची लाट पसरली आहे.