कापसाच्या दरात घसरण, सरकारने निर्यातीला प्रोत्साहन देण्याची गरज.

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


Cotton Price News : सध्या कापसाच्यादरात (Cotton Price) मोठी घसरण झाली आहे. याचा राज्यातील शेतकऱ्यांना (Farmers) फटका बसत आहे.दरात घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांना आपला कापूस (Cotton) घरात साठवूण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कापसाच्या दरात वाढ कधी होणार याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. कापसाच्या दरात वाढ होण्यासाठी निर्यातीत (Export) सातत्य ठेवणं गरजेचं असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं निर्यातीला प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

 

गेल्या हंगामात 11 ते 12 हजार रुपये क्विंटलच्या दरानं विक्री होणारा कापूस यंदा मात्र, 7 ते 8 हजार रुपय दरानं विक्री केला जात आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. चालू हंगामात शेतकऱ्यांना कापसाला किमान 10 हजार रुपये प्रतिक्विंटल दर हवा आहे. हा दर कापड उद्योगांना महाग वाटत असल्यानं त्यांना कमी दरात कापूस हवा असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.सध्या बाजारात रुईचे दर प्रतिखंडी 61 ते 36 हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत. देशात सरकीचे दर 3 हजार 600 ते 4 हजार रुपये प्रतिक्विंटल असल्याने कापसाला 8 हजार 200 ते 8 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. गेल्या पंधरवड्यात सरकीचा दर प्रतिक्विंटल 3 हजार 400 रुपयांपर्यंत खाली आल्यानं कापसाचे दर कमी झाले होते. शेतकऱ्यांना 10 हजार रुपये प्रतिक्विंटलची अपेक्षा आहे. ही पातळी गाठण्यासाठी किमान 45 लाख गाठी कापसाची व सुताची निर्यात करणे, यात सातत्य ठेवणे व निर्यातीला केंद्र सरकारने साखरेप्रमाणे इन्सेंटिव्ह देणे आवश्यक असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.अत्यावश्यक कामांसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज

 

कपाशीचे दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अद्याप कापूस बाजारात विक्रीसाठी नेला नाही. तर जिनिंग आणि प्रेसिंग युनिटमध्ये देखील कपाशीची आवक वाढली नसल्याचे चित्र आहे. परंतू शेतकऱ्यांना लागलेला मजुरीचा खर्च, घरात असणारे लग्न समारंभ याशिवाय मुलांचे शिक्षण आणि मूलभूत गरजांसाठी पैसा अत्यावश्यक असतानाही कापूस दर कसा वाढेल याचीच प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. मागील वर्षी कापशीला मिळालेल्या बाजारभावामुळं शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीची लागवड वाढवली होती. पण अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले. अतिवृष्टी आणि कापाशिवरील रोगामुळे कपाशीच्या उत्पादनात घट आली आहे.