जिल्हापरिषदेच्या नुतन प्रशासकीय ईमारतीसमोरील महापुरूष व लोकनेत्यांच्या स्मारकांचे काम तात्काळ पुर्ण करा

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


जिल्हापरिषदेच्या नुतन प्रशासकीय ईमारतीसमोरील महापुरूष व लोकनेत्यांच्या स्मारकांचे काम तात्काळ पुर्ण करा

___
जिल्हापरिषदेच्या नुतन भव्य प्रशासकीय ईमारतीसमोर महापुरूषांचे व लोकनेत्यांचे पुतळे उभारण्याची घोषणा,ठराव आणि फायलींचा फार्स जिल्हाप्रशासनाकडुन कामास होत असलेली दिरंगाई या धोरणाच्या निषेधार्थ व तात्काळ स्मारकाचे काम पुर्ण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मावळ्यांच्या वेशात सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली शंभुप्रेमी बीडकरांनी जिल्हापरिषद ईमारती समोर आज दि.१६ जानेवारी सोमवार छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा दिनी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येऊन मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात बीड जिल्हाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती,शेख युनुस,बलभीम उबाळे,मुबीन शेख,शेख मुस्ताक, राहुल कवठेकर,मसु शेळके,बीड जिल्हाध्यक्ष आप माजी सैनिक अशोक येडे,जिल्हा उपाध्यक्ष अक्रम शेख,शहराध्यक्ष सय्यद सादेक,माजी सैनिक संजय खाडे,
आदि सहभागी होते.

जिल्हापरीषदेच्या नुतन प्रशासकीय ईमारतीच्या आवारात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा,छत्रपती राजश्री शाहु महाराज,महात्मा ज्योतीराव फुले,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांसह दिवंगत लोकनेते सुंदरराव सोळंके व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे पुतळे उभारण्याचे प्रस्तावित असून जिल्हापरिषदेच्या ईमारतीसमोर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा असा अनेक वर्षापुर्वीचा ठराव मंजूर असुन याची अंमलबजावनी व्हावी यासाठी शंभुप्रेमींनी वारंवार आंदोलने केलेली आहेत. वर्षभरापुर्वी नुतन प्रशासकीय ईमारतीचे लोकार्पण करण्यापुर्वी अगोदर पुतळ्यांची उभारणी व नंतर नव्या ईमारतीत कारभार अशी भुमिका घेत धरणे आंदोलन करण्यात आले होते. सत्ताधा-यांनी भुमिपुजन करून लवकरच काम पुर्ण करण्यात येईल या आश्वासनानंतर लोकार्पण करण्यात आले मात्र याचा सत्ताधारी व जिल्हाप्रशासनाला विसर पडला आहे.

जिल्हापरिषद आवारातील महापुरूष व लोकनेत्यांच्या स्मारकाबाबत जिल्हाप्रशासन गंभीर नसुन बांधकाम विभाग व लेखा व वित्त विभाग यांचा कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार अतिशय संतापजनक असुन १९ मार्च रोजी भुमिपुजनानंतर वर्ष होत आले तरी कामाचा पत्ताच नाही व पुतळ्यांचा खर्च व निधी याबाबी अधांतरीच आहेत शंभुप्रेमीमध्ये याबद्दल तिव्र नापसंती असून लवकरात लवकर काम सुरू करून पूर्णत्वास नेले नाही तर आधिक तीव्र आंदोलने करण्यात येतील :- डाॅ.गणेश ढवळे

बांधकाम विभाग क्रमांक १ आधिका-यांची जिल्हापरिषद यांची आंदोलनस्थळी भेट
____
श्री.चव्हाण एम.एस. उपकार्यकारी अभियंता, पवार एस. डी. उप अभियंता बांधकाम जि.प.उपविभाग यांनी भेट देऊन लवकरात लवकर काम पुर्ण करण्याबाबत लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.