शिक्षिकेचा 16 वर्षीय विद्यार्थ्यावर जडला जीव, मुलासोबत फरार अन्…

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


नोएडा येथील आहे. एका 16 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात 23 वर्षीय शिक्षिका पडल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

नोएडाच्या सेक्टर-123 येथील उन्नती विहार कॉलनीमध्ये राहणारे विजय शुक्ला यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या 16 वर्षांच्या मुलाला शिकवणी देत ​​असलेल्या 23 वर्षीय शिक्षिकेने मुलाचे अपहरण केले असल्याचे म्हटले आहे. मुलाच्या वडिलांनी या शिकवणी शिक्षकाविरुद्ध सेक्टर-113 पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उन्नती विहार कॉलनीतील रहिवासी विजय शुक्ला यांनी तक्रार दाखल केली, त्यांचा 16 वर्षांचा मुलगा अनुराग शुक्ला याच कॉलनीत राहणाऱ्या आयशा नावाच्या शिक्षिकेकडे शिकवणीसाठी जात होता. शिक्षिकेने मुलाचे अपहरण करून फरार झाल्याचा आरोप विजय शुक्ला यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना शिक्षिका विद्यार्थ्याला पसंत करत होती अस समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत.