ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

Video : खासदार सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट


पुण्यातील कार्यक्रमात सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली



पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागल्याची मोठी बातमी समोर येत आहे. कार्यक्रमात दिप प्रज्वलन करताना ही घटना घडली आहे.
आग लागल्यानंतर तात्काळ विजवली असून यामध्ये सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) पुण्यातील हिंजवडीत कराटे प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमात दिपप्रज्ज्वलन केल्यानंतर छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालताना खा. सुळे यांच्या साडीने पेट घेतला.

साडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखत आग विझवण्यात आली. सकाळी साडे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. महाराष्ट्र टाईम््स ने यासं मधीत बातमी प्रसारीत केली आहे घटनेत सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झाली नसून त्यांचे दैनंदिन कार्यक्रम ठरल्यानुसार सुरू राहणार आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button