बीड स्फोटकांच्या जीपमधून ६५ किलो गांजा जप्त

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड : (कडा )आष्टी डोईठाण रोडवरील कोहिनी शिवारात स्फोटक वाहतूक करणाऱ्या एका जीपमधून ६५ किलो गांजा जप्त करण्याची कारवाई आष्टी पोलिसांनी केली.
याप्रकरणी पोलिसांनी साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकास ताब्यात घेतले आहे.

मौजे कोहिणी फाटा येथे एका हॉटेलसमोर स्फोटक वाहतूक करणारी जीप गांजा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांना मिळाली. यावरून पोलीस निरीक्षक चाऊस आणि कर्मचारी नायब तहसीलदार शारदा दळवी, सरकारी पंच यांचे पथक कोहिणी फाटा येथे दाखल झाले. येथे एका हॉटेल समोर उभ्या जीपची (क्रमांक एम.एच १६,ए.वाय.६५८६) तपासणी केली असता 65 किलोग्रॅम गांजा आढळून आला. बाजारभावाप्रमाणे या गांजाची किंमत 6 लाख 51 हजार 700 रुपय आहे. पोलिसांनी गांजा आणि जीप असा 10 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चालक नारायणसिंग गोकुळसिंग गुजर ( रा. भावना.ता.जि.मनसोर मध्यप्रदेश ह.मु. बावी.ता.आष्टी. जि.बीड) याला ताब्यात घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक सुनील पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सलीम चाऊस पोलीस निरीक्षक, विजय देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक, शारदा दळवी, नायब तहसीलदार, पोलीस नाईक संतोष दराडे, अमोल ढवळे, राहुल तरकसे, सचिन पवल, रियाज पठाण, सचिन कोळेकर, नितीन बहिरवाल यांच्या पथकाने केली.