पुन्हा Lockdown! शाळा-कॉलेज 15 दिवस बंद; सरकारने दिली मोठी माहिती

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट (China Coronavirus News) झाला असून जगभरावर त्याचे सावट दिसत आहे. चीनमध्ये सध्या सुरुवातीला झालेल्या कोरोना (Corona Virus) विस्फोटपेक्षाही भयंकर स्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे.
याचाच परिणाम आजूबाजूच्या देशांवरही झाल्याचे पाहायला मिळतय. चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना व्हेरिएंटचे रुग्ण भारतातही आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. यानंतर केंद्र सरकारने देशातील प्रत्येक विमानतळावर चीन, जपान, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, थायलंड आणि सिंगापूर या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी (RTPCR) करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अशातच देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

भारतातही BF.7 व्हेरिएंटचे रुग्ण

खबरदारीचा उपाय म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने कोरोनाच्या नियमांसंदर्भात नियमावलीही जारी केली आहे. भारतातही दैनंदिन आढळणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून येत नसली तरी लोकांमध्ये भीती कायम आहे. या सगळ्यात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजने धक्काच बसला आहे. चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या BF.7 व्हेरिएंटचा देशात प्रसार होऊ नये म्हणून 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याची माहिती सोशल मीडियावर फिरत आहे.

देशात 15 दिवसांचा लॉकडाऊन?

देशात लॉकडाऊन लागल्यास शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये 15 दिवस बंद राहतील, असेही या मेसेजमध्ये म्हटले आले. काही माध्यमांनीही 15 दिवसांच्या लॉकडाऊनबाबतच्या या बातम्या चालवल्याने लोकांमध्ये पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन पीआयबी फॅक्ट चेकने तपास सुरू केला. व्हायरल झालेल्या बातमीचा तपास करत पीआयबी फॅक्ट चेकने मोठा खुलासा केला आहे. पीआयबी फॅक्ट चेकने केलेल्या तपासणीत सरकारने लॉकडाऊनसह शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचे कोणतेही आदेश दिले नसल्याचे समोर आले आहे.

पीआयबी फॅक्ट चेकचा मोठा खुलासा

पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) आपल्या अधिकृत हँडलवरून ट्वीट करत याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला लॉकडाऊन आणि शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. “सोशल मीडियावर अनेक बातम्या शेअर करताना, असा दावा केला जात आहे की कोविड 19 मुळे (Covid19) देशात लॉकडाऊन असेल आणि शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील. हे सर्व दावे खोटे आहेत. कोविडशी संबंधित अशी कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासा,” असे पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. याआधीही, डिसेंबर 2022 मध्ये कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात अनेक खोट्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.
चीनमधल्या व्हेरिएंटचे भारतात आणखी चार रुग्ण

चीनमधल्या BF.7 व्हेरिएंटचे चार संक्रमित पश्चिम बंगालमध्ये आढळून आले आहेत. यातील तिघे एकाच कुटुंबातील आहेत. संक्रमित झालेले सर्व नुकतेच अमेरिकेतून परतले होते. 29 डिसेंबर 2022 रोजी त्याचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. तसेच भारतात आलेल्या एका विदेशी नागरिकालाही या व्हेरिएंटची लागण झाल्याचे समोर आले आहे.