मृत घोषित केलेल्या वृद्ध महिलेने स्मशानभूमीतच डोळे उघडले

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या वृद्ध महिलेने स्मशानभूमीतच डोळे उघडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये 81 वर्षांच्या महिलेला स्मशानात अंत्यविधीसाठी आणण्यात आलं होतं, पण तिकडेच तिने डोळे उघडले.
या प्रकारानंतर अंत्ययात्रेसाठी आलेल्यांचाही थरकाप उडाला. 81 वर्षांच्या या वृद्ध महिलेचं नाव हरीभेजी आहे. डॉक्टरांनी या महिलेला ब्रेन डेड घोषित केलं. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर या महिलेला स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आणण्यात आलं, पण तिकडेच तिने डोळे उघडले.

यानंतर नातेवाईकांनी महिलेला घरी परत आणलं. यानंतर दुसऱ्या दिवशी महिलेचा मृत्यू झाला. फिरोजाबादच्या ट्रॉमा सेंटरमध्ये 23 डिसेंबरला या महिलेला ऍडमिट करण्यात आलं. मंगळवारी महिलेला मेंदूची काहीच हालचाल होत नसल्यामुळे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

पण स्मशानभूमीत नेल्यानंतर तिने डोळे उघडले, पण महिलेची प्रकृती अतिशय गंभीर होती. यानंतर बुधवारी तिचा मृत्यू झाला. महिलेचा मुलगा सुग्रीव सिंग यांनी अंत्यविधी केले. या सगळ्या प्रकारानंतर महिलेच्या मुलाने मीडियासोबत संवाद साधला. आई जिवंत असतानाही डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं, असं महिलेचा मुलगा म्हणाला.