प्रेमात एवढे बुडाले की जावयाने सासऱ्याला भरपूर दारू पाजली आणि सासूला घेऊन पसार

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात सासू-जावयाची लव्हस्टोरी समोर आली आहे. ४० वर्षांच्या सासूचा तिच्या २७ वर्षीय जावयावर जीव जडला.
प्रेमात एवढे बुडाले की एक दिवस जावयाने सासऱ्याला भरपूर दारू पाजली आणि सासूला घेऊन पसार झाला. त्यापूर्वी सासऱ्याचा डोळा उघडला त्याने जे पाहिले त्यामुळे सासरा पुन्हा बेशुद्ध पडला होता. आता सगळी उतरल्यावर सासऱ्याने पोलिसांत धाव घेतली आहे.

प्रेम आंधळे असते, युद्धाच आणि प्रेमात सारे काही माफ असते असे म्हणतात. अनादरा पोलीस ठाणे परिसरातील सियाकरा गावात विचित्र घटना घडली आहे. सासू जावयामध्ये प्रेम एवढे रंगले की त्यांनी रविवारी बायको आणि नवऱ्याला सोडून पलायन केले आहे. जावई नारायण जोगी विरोधात सासऱ्याने पोलीस तक्रार दिली आहे.
त्याची मुलगी किसनाचे लग्न नारायण जोगी सोबत झाले होते. लग्नानंतर मुलगी आणि जावई घरी यायचे. ३१ डिसेंबरला जावई आला होता. यावेळी त्याने सासरा रमेशसोबत पार्टी केली. रमेशला दारू ढोसली, यामुळे सासरा रमेश मद्यधुंद अवस्थेत होता. पहाटे ४ वाजता डोळे उघडले तेव्हा घरात त्याची पत्नी आणि जावई नव्हते. दोगेही बेपत्ता होते, यामुळे शोधाशोध केली तरी सापडले नाहीत. या टेन्शनने तो पुन्हा बेशुद्ध पडला.

मुलगी सासरीच होती. तिला सकाळी फोन केला, तेव्हा त्याला सारा प्रकार समजला. सासऱ्याला तितक्यातच आणखी एक धक्का बसला. सासऱ्याला तीन मुली आणि एक मुलगा आहे. चारही जणांची लग्ने झालेली आहेत. जावयालाही तीन मुले आहेत. जावई सासूला पळवून नेताना सोबत त्याची एक मुलगी देखील घेऊन गेला आहे. आता पोलीस या रंगेल सासू-जावयाला शोधत आहेत.