मेट्रो वन ट्रेनच्या दरवाजात महिलेचा ड्रेस अडकला ट्रेन सुरू झाली धक्कादायक व्हिडिओ

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांसाठी प्रवासाचं एक उत्तम साधन म्हणून ट्रेनकडे पाहिलं जातं. मात्र, अनेकदा रेल्वे स्टेशनवर लोकांसोबत असे काही प्रकार घडतात, जे अतिशय धक्कादायक असतात.
अनेकदा वेळेत स्टेशनवर न पोहोचलेले लोक घाईत ट्रेन पकडण्याच्या नादत स्वतःचा जीव धोक्यात टाकतात. ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना झालेल्या भयानक अपघातांचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. असाच आणखी एक धक्कादायक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
मुंबईमध्ये एक अतिशय भयानक घटना घडली.

यात मुंबई मेट्रो वन ट्रेनच्या दरवाजात महिलेचा ड्रेस अडकला. यानंतर महिलेला काही समजण्याच्या आतच ट्रेन सुरू झाली आणि प्लॅटफॉर्मच्या शेवटपर्यंत ट्रेनने महिलेला ओढत नेलं. ही घटना 21 ऑक्टोबरची आहे. मात्र घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की चकला स्टेशनवर सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी ही घटना घडली. यात एक महिला स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे.तिचा ड्रेस मेट्रो कोचच्या दरवाजात अडकला आहे. ट्रेन सुरू होताच ही महिलाही ट्रेनसोबत ओढली जाऊ लागली. यानंतर जवळच उभा असलेल्या एका प्रवाशाने महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला.
व्यक्तीने महिलेला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र याचा काही उपयोग झाला नाही. कारण हा व्यक्ती वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच ट्रेनचा वेग वाढला. यानंतर ट्रेनने महिलेला प्लॅटफॉर्मच्या रेलिंगच्या शेवटपर्यंत खेचत नेलं. शेवटी ही युवती या घटनेत गंभीर जखमी झाली. तिला स्ट्रेचरवरुन रुग्णालयात नेण्यात आलं. या संपूर्ण घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे.