ताज्या बातम्यादेश-विदेशबीडमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

तरुणांनी दारू नाहीतर मसाला दूध पिऊन नववर्षाचं स्वागत करायला पाहिजे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


बीड : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात दारू प्यायली जाते. यामुळे युवा पिढीवर परिणाम होतो. तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवलं पाहिजे. त्यामुळे मी असं म्हणेन की, तरुणांनी दारू नाहीतर मसाला दूध पिऊन नववर्षाचं स्वागत करायला पाहिजे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
व्यसनमुक्त बीड अभियानात देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) मार्गदर्शन करत होते.

तरुणांना व्यसनमुक्त करणे आवश्यक आहे. एखादा समाज संपवायचा असेल तर त्या समाजातील तरुणाईला सुखासिन करा, व्यसनाधीन करा. मग आपोआप समाज संपतो. पण समाजाला उभं करायचं असेल तर सुखासिनतेपासून आणि व्यसनांपासून दूर करावं लागेल.
यावेळी फडणीसांनी स्वामी विवेकानंद यांचं एक वाक्यही स्मरण करून दिलं. ‘स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की मला असे तरुण पाहिजेत जे तरुण खरा अर्थाने सुदृढ आहेत, व्यसनांपासून दूर आहेत. मंदिरात नाहीत गेलात तरी चालेल पण मैदानात जाऊन फुटबॉल खेळा कारण भारतमातेला सुदृढ तरुणांची गरज आहे.’

यावेळी त्यांनी पाकिस्तनाच छुपा अजेंडाही तरुणांना सांगितला. ‘आज आपण पाहतो आपल्या देशाशी युद्ध करता येत नाही म्हणून पाकिस्तान छुपे युद्ध करतो. आपल्या देशामध्ये अंमली पदार्थ पाठवायचे आणि तरुणाईला व्यसनाधीन केलं जातं. पाकिस्तानच्या लगत असलेल्या पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ पाठवले गेले. मोठ्या प्रमाणात तरुणाईला व्यसनाधीन केलं गेलं. दुष्मनांशी मुकाबला करताना तरुणाई व्यसनाधीन असेल तर ती लढणार कशी, लढण्यासाठी त्यांनी व्यसनमुक्त असणे गरजेचं आहे,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दिवंगत आमदार विनायक मेटे यांनी २०१५ साली व्यसनमुक्तीची संकल्पना मांडली होती. त्यांनी अनेकवेळा मला निमंत्रित केले, पण मला यायला जमले नाही. मात्र, मेटेंच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ज्योतीताईंनी त्यांचं हे कार्य पुढे नेण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याला हातभार लावण्यासाठी आज आवर्जून आलो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फक्त बीडच नव्हेत तर अवघ्या महाराष्ट्रात व्यसनमुक्तीचा कार्यक्रम करण्याकरता प्रयत्न करणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. तसंच, उपस्थित जनसमुदायाकडून व्यसनमुक्त राहण्यासाठी प्रतिज्ञाही वाचून घेतली.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


Back to top button