ताज्या बातम्यादेश-विदेशमहत्वाचे

लिंबुमूळे खरंच कोरोना बरा होतो का?डॉक्टर स्वत: थकून हॉस्पिटलमध्येच कोसळत आहेत चीनच्या बाजारपेठांमध्ये लिंबूची मागणी


एखादा रोग पसरला की, मग त्यावरचे उपाय आणि तो रोग होऊ नये यासाठीचे उपाय असे गल्ली-गल्लीत सांगितले जातात. प्रत्येक चौकात काहीतरी नवीन शोध लागलेला असतो. मागे भारतात ज्यावेळी कोरोना नवीन नवीन आला तेव्हा कोरोना चिकन खाल्ल्यामुळे होतो अशी अफवा पसरली होती…
सध्या अश्याचप्रकारे चीनमध्ये लिंबूच्या सेवनामुळे कोरोनापासून सुरक्षा मिळते अश्या चर्चा आहेत…लिंबुमूळे खरंच कोरोना बरा होतो किंवा मग, त्यापासून सुरक्षा मिळते या सगळ्या अफवा आहेत की मग त्यामागे काही तथ्य आहे ते पाहुया…

चीनमध्ये सध्या कोरोनानं हाहाकार माजवलाय…

चीनमध्ये सध्या कोरोनाचा नवा व्हेरियंट पसरलाय. या व्हेरियंटचं नाव BF.7 असं आहे. हा व्हेरियंट चीनमध्ये धुमाकूळ घालतोय. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२२ या दोन आठवड्यात चीनमध्ये तब्बल एक लाख पंधरा हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे नवे पेशंट्स आढळलेत.

चीनमधील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी चीन सरकारनं लागू केलेली झीरो कोव्हिड पॉलिसी खूप सक्तीची केली होती. यामुळे नागरिकांना त्रास होतोय असं म्हणत नागरिकांनी देशव्यापी निदर्शनं केली होती. त्यामुळे, चीननं निर्बंध काढून टाकले आणि चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळतंय.

चीनमधली परिस्थिती सध्या इतकी भयावह झालीये की, पेशंट्सवर उपचार करण्यासाठी डॉक्टर कमी पडत आहेत. जे डॉक्टर्स आहेत ते डॉक्टर्स स्वत: आता आजारी पडतायत. डॉक्टर स्वत: थकून हॉस्पिटलमध्येच कोसळत असल्याचा एक व्हिडीओही सध्या व्हायरल होतोय.

चीनमध्ये सध्या औषधांची कमतरता भासतेय…
कोरोनाची भयावह परिस्थिती बघून सध्या चीनमधले नागरिक हे ताप, सर्दी, खोकला यासाठीच्या औषधांची खरेदी करून ठेवतायत. त्यामुळे, मार्केटमध्ये औषधांची कमतरता भासतेय. याशिवाय, चीनमधलं लसीकरण झालेल्या नारिकांचं प्रमाणही फार जास्त नसल्याचे सांगितलं जातं आहे.

औषधांना पर्याय म्हणून लिंबूची मागणी…

चीनमध्ये औषधांचा तुटवडा भासत असतानाच मार्केटमध्ये लिंबूंची मागणी मात्र मोठ्या प्रमाणावर वाढलीये. खास करून, बीजिंग आणि शंघाई या दोन शहरांमध्ये जिथे औषधांची कमतरता भासतेय तिथे लिंबूंची मागणी वाढल्याचं वृत्त आहे. याचा अर्थ तिथले नागरिक कोरोनावरील औषधांना पर्याय म्हणून लिंबूचं सेवन करतायत असं लक्षात येतंय.

खरंच लिंबू कोरोनासाठी प्रतिबंधक आहे का हे पाहूया…
अजून तरी कोणत्याही प्रकारच्या अधिकृत माहितीमध्ये अश्या प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही की, लिंबूच्या सेवनानं कोरोनाची भीती कमी होते किंवा कोरोनाशी लढायला मदत होते. असं असलं तरीही चीनच्या बाजारपेठांमध्ये लिंबूची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली पाहायला मिळतेय.

आता लिंबू खाल्ल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतो असं नसलं तरी लोक लिंबू विकत घेतायत या मागे फक्त अफवाच आहे का? किंवा मग, लिंबूच्या सेवनाचा काहीच फायदा होणार नाहीये का? तर, तसंही नाहीये… लिंबूमध्ये असं काहीतरी आहे की, लोकांना लिंबू हे वरदान वाटतंय…

लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असून इतर घटक व्हिटामिन सी, फायबर, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम हे घटक आसतात.

आता यातला व्हिटामिन सी हा घटक शरीराची इम्यूनिटी सिस्टम म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करतो फायबरमुळे पचनशक्ती सुधारते. कॅल्शियममुळं हाडं मजबूत होण्यास मदत होते. पेशींची वाढ, प्रोटिन्स तयार करण्यासाठी, खराब झालेले टिशूज् बरे करणे यासाठी शरीरात झिंकचं प्रमाण संतुलित असणं गरजेचं असतं.

आता या सगळ्याचा विचार केला तर, लिंबू हे असं फळ आहे जे फक्त कोरोनासाठीच नाही तर,अनेक रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी फायदेशीर आहे. लिंबू खाल्ल्यामुळे आपली इम्यूनिटी सिस्टीम मजबूत होते तर, इतरही अनेक आरोग्यदायी फायदे लिंबूमुळे होत असल्याचा दावा करण्यात येतो.

चीनच्या बाजारपेठांवर लिंबूच्या मागणीचा झालेला परिणाम…
चीनमधल्या बीजिंग आणि शंघाई या दोन मोठ्या शहरात लिंबूची मागणी वाढलीये. अर्थात एखाद्या गोष्टीची मागणी वाढली की, किंमत वाढणं हा नियमच आहे. चीनमध्ये साधारण ४-६ युआन (चीनमधील चलन) म्हणजे साधारण ४८ ते ७१ रुपये किलोने मिळणारे लिंबू हे सध्या १२ युआन म्हणजे जवळपास १५० रुपये किलोने मिळतायत.

याशिवाय, चीनमधल्या शेतकऱ्यांच्या मते लिंबूची विक्री मागच्या आठवड्याभरात पाच ते सहा पटीनं वाढलीये. त्यामुळे, चीनमध्ये लिंबूला कोरोनाचा संहारी समजलं जातंय हे लक्षात येतंय.

लिंबूशिवाय इतरही फळांची मागणी वाढलीये…
चीनच्या मार्केटमध्ये फक्त लिंबूच नाही तर, इतरही सर्वच फळांची मागणी वाढलीय. मुळात रासायनिक औषधांची कमतरता भासू लागल्यानं आता चीनमधले नागरिक हे नैसर्गिकरीत्या आपली इम्यूनिटी सिस्टीम वाढवण्याच्या मागे लागलेत. आणि ‘अ‍ॅन अ‍ॅप्पल अ डे, कीप्स डॉक्टर अवे’ अशी इंग्लिशमध्ये म्हण असली तरीही, फक्त सफरचंदच नाही तर, कोणतंही फळ हे तब्बेतीसाठी उत्तमच असतं.

येवढासा लिंबू खरंच कोरोना बरा करू शकतो का? हा प्रश्न इथं महत्त्वाचा आहे…
कोरोना महामारीनं जगभरात थैमान घातलं होतं. आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स बंद होत्या. लोक आपल्या घरात कोंडले गेले होते. सर्वसामान्यांचे बँक अकांऊंट्स रिकामे झाले होते. सगळ्या मेडिकल कंपन्यांनी जीव ओतून त्यावर लस बनवण्यासाठी मेहनत केली आणि असं असताना येवढासा लिंबू खरंच कोरोना बरा करू शकतो का?

तर, याचं उत्तर सध्यातरी कोणत्याही ऑथोराईज्ड व्यक्तीनं दिलेलं नसल्यामुळे ‘नाही’ असंच आहे.. पण, आपल्या शरीराची इम्यूनिटी सिस्टीम चांगली करायची असेल तर मात्र लिंबू हा फायदेशीर आहे. अर्थात यामुळे तुम्हाला कोरोना होणारच नाही किंवा, झाला तरी लगेच बरा होईल असं नसलं तरी, कोरोनासोबत लढायला लिंबू तुम्हाला बळ नक्कीच देऊ शकतं.

दरम्यान, भारतात सुद्धा या BF.7 या नव्या व्हेरियंटचा पहिला रुग्ण गुजरातमध्ये आढळलाय. त्यामुळे, कोरोना पुन्हा एकदा देशभरात पसरू नये यासाठी काय करता येईल यासंदर्भात उच्चस्तरीय बैठका आणि हालचालींना सुरूवात झालीये. त्यामुळे, भारतातही लिंबूचे दर आणि मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button