क्राईमताज्या बातम्याबीडमहत्वाचेमहाराष्ट्र

बीड नवनिर्वाचित सरपंचावर विरोधी गटाचा प्राणघातक हल्ला


बीड : बीडच्या माळापुरी येथे नवनिर्वाचित सरपंचावर विरोधी गटाने प्राणघातक हल्ला
हल्ल्यात सरपंचासह अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत. अशोक ढास असे जखमी असलेल्या नवनिर्वाचित सरपंचांचे नाव असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचे पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
बीड : राज्यात नुकतेच ग्रामपंचायत निवडणूकींचे मतदान ( Gram Panchayat Election Voting ) पार पडले. दरम्यान, काल आलेल्या निवडणूकींच्या निकालावरून वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. बीड जिल्ह्यातून सरपंचावर ग्रामपंचायत निवडणूकीच्या वादातून प्राणघातक हल्ला ( Assault on Sarpanch over Gram Panchayat Elections ) झाल्याची घटना घडली आहे.

सरपंचावर प्राणघातक हल्ला : बीडच्या माळापुरी येथे नवनिर्वाचित सरपंचावर विरोधी गटाने प्राणघातक हल्ला ( Assault on Sarpanch Malapuri in Beed ) केला आहे. या हल्ल्यात सरपंचासह अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत. अशोक ढास असे जखमी असलेल्या नवनिर्वाचित सरपंचांचे नाव असून त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन : दरम्यान, ग्रामस्थ बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता तक्रार दाखल न करून घेतल्याने, संतप्त ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button