हे काय पाहावं लागत आहे प्रेमीयुगुलांनी लग्नातंच केला डान्स नवरीने मारली मिठी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


प्रेम हे प्रेम असतं. प्रेमासाठी मुलं किंवा मुली काहीही करू शकतात. अनेकवेळा प्रेमापोटी कित्येकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तर काहींनी आपल्या मनासारखं प्रेम न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.
पण एका पठ्ठ्याने आपल्या प्रेयसीच्या लग्नातंच तिला मिठी मारली आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा नवरीसोबत डान्स करताना दिसत आहे. तर नवरदेव शेजारी उभा आहे. त्याचबरोबर गाण्याच्या शेवटी नवरी त्या मुलाला जोरदार मिठी मारत आहे. एका महिलेने त्यांची मिठी सोडल्याचं व्हिडिओत दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ समाजमाध्यामांमध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे.