ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार,आठजण ताब्यात.


एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार (sexual assault on minor girl) केल्याची धक्कादायक घटना पालघरमधील माहीम (Palghar Mahim) येथे घडली आहे.या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आठ तरुणांना सातपाटी पोलिसांनी (Satpati Police)अटक केली आहे. हे दुष्कृत्य पीडित मुलीच्या मित्राने घडवून आणला असल्याचे समोर आले आहे. पीडित अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला.पालघर तालुक्यातील माहीम परिसरातील पाणेरीनजीक 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला एका निर्जनस्थळी नेले. त्यानंतर आठजणांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. मित्रानेच घडवून आणलेल्या या अत्याचारानंतर पीडित मुलीने माहीम पोलीस ठाणे गाठले. तिने झाल्या प्रसंगाची पोलिसांना माहिती देत आठ जणांविरोधात तक्रार नोंदवली. सातपाटी सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या माहीम चौकी दुरक्षेत्रात माहीम परिसर येतो. या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माहीम परिसरातील पानेरी येथे बंद असलेल्या बंगल्यात आणि जवळील झाडीत या पिडीत अल्पवयीन मुलीवर हा अत्याचार करण्यात आला. सर्वप्रथम या मुलीला तिच्या मित्राने या ठिकाणी बोलवून घेतले. त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने आठ जणांनी अत्याचार केले. याप्रकरणी आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हे पालघर तालुक्यातील आहेत. आरोपी माहीम, हनुमान पाडा, टेम्भी, सफाळे, वडराई भागातील रहिवासी असून बहुतांश तरुण हे नशेच्या आहारी असल्याची माहिती आहे. यातील काही आरोपी हे अल्पवयीन असल्याचे समजते. सर्व आरोपींना आज कोर्टात हजर केले जाणार असून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 17 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास माहीम पोलीस ठाण्यात पीडित तरुणीच्या वडिलांनी अल्पवयीन मुलगी शुक्रवारी रात्रीपासून घरी आली नसल्याची तक्रार दिली. तिच्याशी फोनवर संपर्क साधला असता ती फोनवर रडत असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर तांत्रिक बाबींच्या आधारे मुलीचा शोध घेण्यास सायंकाळच्या सुमारास पोलिसांना यश आले. त्यानंतर पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर तरुणीने घडलेला प्रसंग सांगतिला. शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून ते शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या काळात तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला.सध्या पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिची प्रकृती बरी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास सातपाटी पोलीस करीत आहे.
Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button