सावत्र बापानं आपल्या २० वर्षीय मुलाची निर्घुणपणे केली हत्या

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

पंजाब : खळबळजनक सावत्र बापानं आपल्या २० वर्षीय मुलाची निर्घुणपणे हत्या केली आहे.
आरोपी बापानं मुलाची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे हात-पाय बांधले आणि एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकला. त्यानंतर त्यात सिमेंटनं प्लास्टर करुन ड्रम कायमस्वरुपी बंद करून टाकला. जेणेकरुन कुणालाही संशय येणार नाही.

मृत्यू झालेल्या मुलाची आई सविता हिनं पोलिसात तक्रार दाखल केली. यात तिनं पहिला पतीच्या मृत्यूनंतर दुसरं लग्न दीर विवेकानंद मंडल उर्फ सप्पू मंडल याच्याशी केलं. पहिल्या पतीपासून तिला एक २० वर्षांचा मुलगा होता. त्याचं नाव पियूष होतं आणि आईसोबतच राहायचा. पण त्याचा सावत्र वडिलांशी वारंवार वाद होत असे. एक दिवशी याच वादाचं रुपांतर हत्येत झालं आणि बापानं पियूष याची हत्या केली.

सविता यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, पियूष ५ डिसेंबरपासून गायब होता. जेव्हा याबाबत पतीला विचारलं तेव्हा त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यावर तिला संशय आला आणि जेव्हा घराच्या छतावर गेले असता तिथं एक ड्रम दिसला. या ड्रममधून दुर्गंधी येत होती आणि याची माहिती शेजारील लोकांना दिली.

ड्रमला सीमेंटनं प्लास्टर करण्यात आलं होतं. जेव्हा ड्रम फोडण्यात आला तेव्हा आत पियूषचा मृतदेह असल्याचं आढळून आलं. यानंतर मृत पियूषच्या आईनं याची माहिती पोलिसांना दिली आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर आरोपी फरार झाला आहे.

एसीपी मनिंदर बेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून आरोपी वडिलांचा शोध सुरू आहे.