१६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ११ जणांचा सामूहिक बलात्कार
![](https://lokshahinews24.com/wp-content/uploads/2022/12/Screenshot_20221017_175226-1-1-1.jpg)
पालघर : माहीम येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ११ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी पाच तरुणांना सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली असून अन्य सहा तरुणांचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणाने पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सातपाटी सागरी पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या माहीम चौकी दूरक्षेत्रातील माहीम पानेरीजवळ एका निर्जन ठिकाणी माहीम येथे राहणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीवर ११ तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणांपैकी अनेक तरुण हे गर्दच्या आहारी गेल्याची माहितीही समोर येत आहे.
या मुलीवर जबरदस्ती करण्यात आल्यानंतर त्या मुलीने माहीम पोलिस चौकी गाठत या तरुणांविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर सातपाटी सागरी पोलिस स्टेशनमध्ये पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली.
ही मुले माहीम, हनुमानपाडा, टेम्भी, सफाळे, वडराई भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा तपास सुरू आहे.