बीड

पोलिस व्हॅनचे स्‍टेअरिंग ओढले; व्हॅन पलटून पोलिस जखमी


नेकनूर;  शनिवारी सकाळी मुळूकवाडी येथील चुलता खून प्रकरणातील संशयीत आरोपीला स्थळ पाहणी करण्यासाठी पोलिस व्हॅनमधून घेवून जात होते. यावेळी चालत्‍या पोलीस व्हॅनचे स्‍टेअरिंग संशयीत आरोपीने ओढल्‍याने मांजरसुंबा पाटोदा रोडवर ससेवाडीजवळ व्हॅनला अपघात झाला.
यामध्ये पोलीस अधिकारी जखमी झाले.

 

या विषयी अधिक माहिती अशी की, मुळूकवाडी खून प्रकरणातील संशयिताला ज्‍या ठिकाणी गुन्हा घडला त्‍या घटनास्‍थळाची पाहणी करण्यासाठी पोलिस निघाले होते. यावेळी ही घटना घडली. नेकनूर पोलीस स्टेशन येथून पोलीस गाडीमध्ये एपीआय शेख मुस्तफा, पो.कॉ.खाडे, देशमुख आणि दोन पंच मुळूकवाडी खून प्रकरणातील संशयीत आरोपी रोहिदास विठ्ठल निर्मळ याला स्थळ पाहणीसाठी घेऊन चालले होते. मधल्या सीटवर बसलेल्‍या संशयीत आरोपीने चालकाच्या हातातील स्टेअरिंग ओढल्याने पोलिस व्हॅन रस्त्याच्या बाजूला पलटी झाल्‍याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

 

यामध्ये एपीआय शेख मुस्तफा यांच्या डोक्याला आणि खांद्याला मार लागला आहे. दरम्‍यान इतर पोलिस कर्मचारी आणि संशयीत आरोपी किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्वांवर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button