ताज्या बातम्या

दीपिकाने का स्वीकारला इस्लाम.संतप्त प्रतिक्रिया.


दिपिकानं स्वीकारला इस्लाम; संतप्त प्रतिक्रिया थांबता थांबेनाDipika Kakkar ibrahim : विविध मालिका आणि रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला एक चेहरा म्हणजे अभिनेत्री दीपिका कक्करचा (Dipika kakkar). ‘ससुराल सिमर का’ (Sasural simar ka) या मालिकेनं दीपिकाला विशेष ओळख दिली.

इतकंच नव्हे, तर या मालिकेनं तिला प्रत्यक्ष आयुष्यातील जोडीदारही मिळवून दिला. सहकलाकार शोएब इब्राहिम याच्यासोबत दीपिकानं लग्न केलं. (television Actress Dipika kakkar on changing religion to islam answers back to trollers )

लग्नाआधी स्वीकारला इस्लाम?

2018 मध्ये दिपिका आणि शोएबनं लग्न केलं. सूत्रांच्या माहितीनुसार लग्नाआधीच तिनं इस्लाम धर्म (Islam) स्वीकारला होता. आतापर्यंत फार क्वचित चाहत्यांनाच ही बाब ठाऊक असेल, पण फैजा शोएब इब्राहिम हे तिचं लग्नानंतरचं नाव. (dipika kakar shoaib ibrahim)

हो मी इस्लाम स्वीकारला…

इस्लाम स्वीकारण्याबाबत सांगताना दिपिका म्हणाली, ‘हो मी इस्लाम स्वीकारला. पण हे मी का आणि केव्हा केलंय याविषयी चर्चा होण्याची काहीच गरज नाही. हे पूर्णत: खासगी असून, माध्यमांमध्ये याविषयी न बोलणंच उत्तम’.

इस्लाम स्वीकारल्यानंतर मी प्रचंड आनंदात असून, स्वत:च्याच आनंदासाठी आपण हे पाऊल उचलल्याचं ती म्हणाली. दिपिकानं खासगी आयुष्यासाठीच हे पाऊल उचललं होतं. पण, तिच्यावर चाहत्यांनी जोरदार निशाणा साधत टीकेची झोड उठवली होती. आजही दीपिलाकाला तिच्या या निर्णयामुळं अनेकांच्याच रोषाचा सामना करावा लागतो.

नव्या आयुष्याची सुरुवात…

दिपिकाचं हे दुसरं लग्न होतं. यापूर्वी 2011 मध्ये रौनक सॅमसनसोबत ती विवाहबंधनात अडकली होती. पण, 2015 मध्ये त्यांच्या नात्याला तडा गेला होता. अभिनयापूर्वी एअर हॉस्टेस असणाऱ्या दीपिकानं अखेर शोएबशी लग्न करत जीवनात एक नवी सुरुवात केली होती. सध्या ती अभिनय क्षेत्रात फारशी सक्रीय नाही. पण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मात्र दिपिका सातत्यानं प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button