बॉयफ्रेंडचा फोन महिलेने उचललेला तिने रागाच्या भरात बॉयफ्रेंडच घरच पेटवल मग काय?

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


अनेक महिलांना, तरुणींना आपल्या प्रियकर, नवऱ्याने इतर महिलांशी बोललेलं किंवा त्यांची प्रशंसा केलेली आवडत नाही. कधी कळत तर कधी नकळत त्यांच्या मनात मत्सर निर्माण होतो. काही जणी तर थेट आपल्या जोडीदारावर शंका घेऊ लागतात किंवा नात्यात टोक गाठतात.
अशाच एका तरुणीने संशयामुळे आपल्या प्रियकराच्या घरालाच आग लावली आहे.

ही घटना अमेरिकेतील टेक्सास या शहरात घडली आहे. या तरुणीचं नाव सिनॅडा मॅरी सोटो असं आहे. ती 23 वर्षांची आहे. टेक्सास येथील पोलिसांना एका घराला आग लागल्याचा फोन आला आणि ते ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांची भेट सिनॅडाशी झाली. ती तिथे उभी राहून जळणाऱ्या घराचा व्हिडीओ बनवत होती. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानतंर तिने आपणच या घराला आग लावल्याचं कबूल केलं. पोलिसांनी तिला तसं करण्याचं कारण विचारलं. जेव्हा सिनॅडाने ते कारण सांगितलं तेव्हा पोलिसांना हसावं की रडावं हे कळेना.

सिनॅडाचं या घराच्या मालकावर प्रेम आहे. तिने त्याला फोन केला होता. तेव्हा तो फोन एका महिलेने उचलला. आपल्या बॉयफ्रेंडचा फोन महिलेने उचललेला पाहून सिनॅडा भयंकर संतापली. तिने दुसऱ्या दिवशी प्रियकराचं घर गाठलं. तिथे तो घरी नसताना ती त्याच्या घरात शिरली. तिने रागाच्या भरात आधी तिथल्या सोफ्याला आग लावली मग हळूहळू हा आगीचा भडका वाढून सगळं घर पेटलं. त्यापूर्वी तिने प्रियकराच्या घरातलं सामानही चोरलं.

या आगीत जीवितहानी झाली नसली तरी सुमारे 50 हजार अमेरिकन डॉलरचं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाने आग विझवल्याने अजून होऊ शकणारा अनर्थ टळला. गंभीर म्हणजे, नुसत्या संशयावरून सिनॅडाने हे टोकाचं पाऊल उचललं. ज्या महिलेचा आवाज ऐकून तिने थेट घराला आग लावली, ती महिला वयाने मोठी असून प्रियकरांची रक्ताची नातेवाईक होती, जिने त्यावेळी चुकून फोन उचलला होता.