सापाला चप्पल फेकून मारली, चक्क चप्पल तोंडात घेवून सापाचा पोबारा पहा व्हिडिओ

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


जगात अनेक प्रकारचे धोकादायक आणि भयानक प्राणी राहतात. ज्याला पाहून अनेकवेळा लोकांना घाम फुटतो. त्यातील एक म्हणजे साप. कारण सापांमध्ये अत्यंत घातक विष आढळते. माणसाला मारण्यासाठी सापाच्या विषाचा एक थेंबही पुरेसा असतो.
सोशल मीडियावर सापाचा एक व्हिडिओ व्हायरल होतं आहे, ज्यामध्ये साप रस्त्यावरून बाहेर पडून घरात शिरताना दिसत आहे. यादरम्यान त्या घरात उपस्थित असलेली महिला सापाला घरापासून दूर ठेवण्यासाठी त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करताना दिसते. यावरही जेव्हा त्या सापाला भीती वाटत नाही तेव्हा ती महिला त्या सापाला चप्पल फेकून मारते.

व्हिडिओमध्ये पुढे काय होते हे पाहून यूजर्सचे हसू आवरता येत नाही. महिलेची चप्पल निशाण्यावर आदळते आणि साप घाबरून जातो, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर साप त्या चपलावर हल्ला करून तोंडाने पकडतो. त्यानंतर ती चप्पल तोंडात अडकवून साप तिथून बाहेर पडू लागतो.
साप चप्पल घेऊन पळून गेला

हे पाहून महिला सापाकडे चप्पल परत करण्याची विनंती करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ खूपच भयावह आणि मजेदार आहे. अशा परिस्थितीत हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. वृत्त लिहिपर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियावर एक लाखांहून अधिक शेअर झाला आहे.