पुणेमुंबई

मुंबई पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात 5 जण ठार


मुंबई – पुणे एक्स्प्रेसवर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जण ठा झाले आहेत. तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.
इरटीका कारने एका वाहनाला मागून धडक दिल्याने हा भयानक अपघात झाला असल्याचं समोर येत आहे. या गाडीत एकूण 7 लोक होते. यातील 5 जणांचा मृत्यू झाला. 3



या भीषण अपघातात 2 जण गंभीर जखमीही झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत एक महिला वाचली असल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी असलेल्या दोघांनाही उपचारासाठी कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

या घटनेतील सर्व मृत एकाच कुटुंबातील असल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना रात्री बारा वाजताच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की धडक होताच गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. यात गाडीचा दरवाजा तुटला आणि आतील प्रवाशी बाहेर पडले.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button