ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबईराजकीय

मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात निवडणुकीच्या कामाला लागा – उद्धव ठाकरे


महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निडणुकांसदर्भात एक वक्तव्य करत राजकारणात(Maharashtra Politics)खळबळ उडवून दिली आहे.राज्यामध्ये मध्यवधी निवडणुका (mid term elections) लागण्याची शक्यता असल्याचे भाकित उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Congress state president Nana Patole) यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे हे भाकित खरं ठरणार की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

ठाकरे गटाच्या संपर्क प्रमुखांची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला संबोधीत करताना राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात असे उद्धव ठाकरे म्हणाले. कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले.
राज्यातील सध्याचे सरकार ईडीचा धाक आणि कारवाईची भिती दाखवत चालवले जात आहे. सरकारमध्ये काही आलबेल नाही, कधी खोक्यासाठी तर कधी मंत्रिपदासाठी भांडण सुरु असल्याची टीका नाना पाटोले यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी वर्तविलेले मध्यावधी निवडणूकीचे भाकीत खरे होऊ शकते

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

दोन आमदारांमधील भांडण सोडविण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना साडे तीन तास घालवावे लागत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी वर्तविलेले मध्यावधी निवडणूकीचे भाकीत खरे होऊ शकते असेही नाना पटोले म्हणाले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button