ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके ६६२४७ इतक्या मतांनी विजयी


नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंचाविजय

एकोणीसावी फेरी पुर्ण झाल्यानंतर हाती आलेल्या निकालानुसार ऋतुजा लटके 53 हजार 471 मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्यांना एकूण 66 हजार 247 मते पडली, तर नोटाला 12 हजार 776 मते पडली.
अठराव्या फेरीत ऋतुजा लटके 65 हजार 335 मतांनी आघाडीवर, नोटा ला 12 हजार 691 मते

विजय जवळपास निश्चित झाल्यानंतर ऋतुजा लटके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या यांनी मला संधी दिली. लवकरच मातोश्रीवर जाऊन मी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. हा माझा नव्हे तर रमेश लटके यांचा विजय आहे. अंधेरीचा विकास हे त्यांचं ध्येय होते. ते ध्येय मी पुर्ण करणार, असा विश्वासही लटके यांनी यावेळी व्यक्त केला. लोकांची मला साथ आहे. माझे कुटूंब माझ्या सोबत होतं म्हणून मी आज इथे आहे. माझ्या पतीच्या पुण्याईमुळे आज मी इथे आहे. मला पाठिंबा दिलेल्या सर्वांचे मी आभार मानते, आतापर्यंतचा निकाल पाहता ९० टक्के लोकांनी मला साथ दिली. पण ज्यांनी नोटाला मतदान केले ते सर्व भाजपचे मतदान आहे. अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

सोळाव्या फेरीत ऋतुजा लटके 58 हजार 875 मतांनी आघाडीवर, तर नोटाला 11हजार 569, बाळा नाडार यांना मागे टाकत राजेश त्रिपाठी 1 हजार 380 मतांनी आघाडीवर

पंधराव्या फेरीअंती ऋतुजा लटकेंना 55946 मतं

चौदाव्या फेरीत ऋतुजा लटके 52 हजार 507 मतांनी आघाडीवर, नोटा ला 10 हजार 284 मते

भाजपने अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी बारा फेऱ्या पुर्ण झाल्या आहेत. या फेऱ्यांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक मतमोजणी प्रक्रिया झाली असून आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालात ऋतुजा लटके 45 हजार 218 मतांनी आघाडीवर आहेत. तर नोटा ला 8 हजार 887 मते पडली आहे..

11 व्या फेरीअंती एकूण मतमोजणी

ऋतुजा लटके -42343

बाळा नाडार -1052

मनोज नाईक – 622

मीना खेडेकर – 948

फरहान सय्यद – 753

मिलिंद कांबळे – 455

राजेश त्रिपाठी – 1067

नोटा – 8379

एकूण मतमोजणी – 55619

11 फेऱ्यांची मतमोजणी झालेली आहे अजूनही 8 फेऱ्यांची मतमोजणी बाकी आहे. ऋतुजा लटके यांचा विजयी निश्चित, किती मतांनी विजयी होणार याकडे लक्ष लागले आहे. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व मतदारसंघात जवळपास 1 लाख 47 हजार 117 मतदान झाले होते. त्यापैकी रमेश लटके यांना 62 हजार 773 मतं मिळाली. तर मुरजी पटेल यांना 45 हजार 808 मतं होती.

अकरा फेरीतच ऋतुजा लटके 42 हजार 343 मतांनी आघाडीवर आहेत.

भाजपने अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर नोटा ला मतदान करण्यासाठी प्रचार केला होता. पहिल्या फेरीचा निकाल पाहता तो काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसत होते. पण सातव्या आठव्या फेरीपासून हा वेग काहीसा मंदावल्याचे पाहायला मिळाले.

नवव्या फेरीत ऋतुजा लटके 32 हजार 515 मतं मिळाली असून दहाव्या फेरीत 37 हजार 469 मतांनी आघाडीवर आहेत. तर नवव्या फेरीत नोटा ला 6 हजार 637 मते तर दहाव्या फेरी 7 हजार 556 मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार बाळा नाडार यांना नवव्या फेरीत 897 मते आणि दहाव्या फेरीत 975 मते मिळाली आहेत.

आठव्या फेरीत ऋतुजा लटके यांना 29 हजार 033 मते मिळाली असून नोटा ला 5हजार 655 मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवारांपेक्षा या निवडणुकीत नोटा ला सर्वाधित मते मिळाली आहेत.

सातव्या फेरीत ऋतुजा लटके 24 हजार 955 मतांनी आघाडीवर आहेत. अपक्षांपेक्षा नोटाला सर्वाधिक 4 हजार 712 मते मिळाल्याचे दिसत आहे. तर तिसऱ्या स्थानावर असलेले बाला नाडार यांना 733 मते मिळाली आहेत.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या सहाव्या फेरीचाही निकाल समोर आला आहे. ऋतुजा लटके 21 हजार 090 मतांनी आघाडीवर आहेत. तर नोटाला 4 हजार 338 मते पडली आहेत. तर बाला नाडार यांना 674 मते आहेत.

पाचव्या फेरी ऋतुजा लटके 17 हजार 278 मतांनी आघाडीवर आहेत. तर नोटा ला 3 हजार 859 मते मिळाली आहेत. तर बाळा नाडार यांना 570 इतकी मते आहेत.

चौथ्या फेरीचे निकाल जाहीर झाले असून चौथ्या फेरीतही ऋतुजा लटके यांना 14 हजार 648 मतांनी आघाडीवर आहेत. तर नोटाला 3 हजार 580 मते मिळाली आहेत. तिसऱ्या स्थानावर बाला नाडार असून ते 505 मतांनी आघाडीवर आहेत. तिस-या फेरीतील मतांपेक्षा चौथ्या फेरीत ऋतुजा लटकेंची 257 मते घटली आहे

तिसऱ्या फेरीतही ऋतुजा लटके 11 हजार 361 मतं मिळाली आहेत. तर नोटा 2 हजार 967 मतं मिळाली आहेत. तिसऱ्या फेरीअंती लटकेंना 11 हजार 361 मते मिळालीत.

तर दुसऱ्या फेरीतही ऋतुजा लटके आघाडीवर असून त्यांना 12 हजार 094 इतकी मते पडली आहेत. तर दुसरीकडे नोटा ला 2 हजार 092 पडल्याचे दिसत आहेत. तिसऱ्या स्थानी बाला नाडार असून त्यांना 339 मते पडली आहेत.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पहिल्या फेरी निकाल समोर आला आहे. पहिल्या फेरीत ऋतुजा लटके आघाडीवर असून त्यांना 4 हजार 277 मते पडली आहेत. तर दूसऱ्या क्रमांकांची म्हणजे 622 मते नोटा पडल्याचे दिसत आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा आज (६ नोव्हेंबर) निकाल लागणार आहे. ३ नोव्हेंबरला रोजी या जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button