धम्मदीक्षा दिनानिमित्त प्रबोधन कार्यक्रम सपन्न

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


धम्मदीक्षा दिनानिमित्त 22 प्रतिज्ञांचे वाचन सावळापूर येथे धम्मदीक्षा दिनानिमित्त प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रिय धम्म जागृती युवा संघाचे अध्यक्ष सुरेश भिवगडे उपस्थित होते याप्रसंगी त्यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण तसेच सामुदायिक बुद्ध वंदना व बुद्ध प्रतिष्ठापना पार पडले याप्रसंगी या धम्मक्रांती दिनाच्या निमित्ताने बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नागपुर येथील भाषणाचा संदर्भ दिला
उत्कर्ष हा फक्त बौद्ध धर्मातच होऊ शकेल. सागरात गेल्यावर शा सर्व नद्या एकजीव व समान होतात त्याप्रमाणे बौद्ध संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात, असे समतेने सांगणारा एकच महापुरुष म्हणजे भगवान बुद्ध होय,’’
या कार्यक्रमाला आदरणीय समाज सेवक मधुकर सोमकुवर यांनी बुद्ध धम्मावर विचार व्यक्त केले तर मुकुंद गायकवाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्म का निवडला यावर मार्गदर्शन केले. तर सरपंच भारती बनसोड यांनी विचार मांडले याप्रसंगी विनोद सोमकुवर,प्रमोद मेश्राम, रामचंद्र डोंगरे, शेषराव कुसरे, आतिश मेश्राम, चंद्रकला गोंडाने, बरखा शेंडे, कुंदा वाघमारे ई.सोबत गावातील बुध्द उपासक उपासिका उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजनात रमाबाई महिला मंडळ सावळापुर, भीमाबाई महिला मंडळ, संघमित्रा महिला मंडळ, तक्षशीला महिला मंडळ यांचा सहभाग होता.
याशिवाय आर्वी शहरांतील अनेक बुद्ध विहारात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तक्षशीला बुद्ध विहार अंतरडोह पुनर्वसन येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ समारोपिय कार्यक्रम आयोजित करण्यात
याशिवाय चंद्रमणी बुद्ध विहार माटोडा बेनोडा येथे वर्षावास समापन निमित्त ग्रंथ समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमालाही प्रमूख मार्गदर्शक म्हणुन धम्म प्रचारक सुरेश भिवगडे उपस्थित होते.
याशिवाय डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती आर्वी तर्फे या धम्मक्रांती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले या दिपक ढोणे, सूरज मेहरे, सचिन मनवरे महाराणा प्रताब वॉर्ड शाखा संघटक मार्शलअर्पित वाहणे समता सैनिक दल आदी उपस्थित होते
महाप्रजापती गौतमी बुद्ध विहार येथे धम्म प्रबोधन व 22 प्रतिज्ञा वाचन आयोजीत करण्यात आले या कार्यक्रमाला धम्मप्रचारक सुरेश भिवगडे उपस्थित होते.
गगन मलीक फाऊंडेशन तर्फे बुद्ध विहाराना
मिळालेल्या बुद्धमूर्तीबाबत विविध बुद्ध विहार समितिकडून आभार व्यक्त करण्यात आले

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !