केज-अंबाजोगाई रोडवर चार वर्षाच्या मुलाला अज्ञात वाहनाने चिरडल्याने

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


बीड : केज-अंबाजोगाई रोडवर येथे मोटार सायकवरून पडलेल्या एका चार वर्षाच्या मुलाला अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.आशिष खंडू पवार असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी घडली.

या बाबतची माहिती अशी की, धनराज पवार आणि त्यांची पत्नी हे त्यांचा चार वर्ष वयाचा पुतण्या आशिष पवार यास घेऊन अंबाजोगाई वरून मोटारसायकलने कुंबेफळ येथे येत होते. दरम्यान ते चंदनसावरगाव येथील हॉटेल निसर्ग जवळ आले असता आशिष हा गाडीवरून खाली पडला आणि त्याच वेळी रस्त्याने जाणाऱ्या वाहनाने त्याला चिरडले. यात आशिष पवार या चार वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

युसूफवडगाव पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांनी पोलीस कर्मचारी संपतराव शेंडगे यांना अपघातस्थळी रवाना केले. पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी व शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल केले असून अपघाताचा पंचनामा करण्यात येत आहे.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !