देशाच्या सुरक्षिततेसाठी एकता महत्त्वाची आहे. म्हणूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून रन फॉर युनिटी दौड सुरू केली – पालकमंत्री अतुल सावे

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

बीड : जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी जिल्हा क्रीडा संकुलात विविध सुविधा निर्माण करण्यात येतील. तसेच केंद्र शासकीय योजनेतून बीडमध्ये नवीन भव्य असे क्रीडा संकुल निर्माण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज येथे केले.

देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एकता दौड (रन फॉर युनिटी) रॅलीच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी त्यांच्या हस्ते रॅलीस हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून सुरू होऊन एकता दौड नगर रोड – शिवाजी चौक – जालना रोड या मार्गाने जाऊन जिल्हा क्रीडा संकुल येथे तिची सांगता झाली. यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, राजेंद्र म्हस्के आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

ताज्या बातम्या वाचा व जगाशी रहा कनेक्टेड त्यासाठी NEWS वर टच करून व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा.

पालकमंत्री अतुल सावे म्हणाले, देशाच्या सुरक्षिततेसाठी एकता महत्त्वाची आहे. म्हणूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून रन फॉर युनिटी दौड सुरू केली. या एकता दौडमध्ये सर्व नागरिक, युवक, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी यांचाही सहभाग घेतला जावा. एकतेचे प्रतीक असणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी प्रेरणादायक आहे, असे ते म्हणाले.

नवगण डोअर बीड वर टच करा व पहा सुंदर डोअर डिझाईन,आपल्या सुंदर घराला शोभा येईल सुंदर दरवाज्या मुळे लॅमीनेशन डोअर , फायबर डोअर सन्माईका डोअर ,सागवान डोअर , आर्कशक रंगसंगती , सुंदर डीझाईन ,100% वॉटरप्रूफ तर मग आजच भेटा व आपली बुकींग करा ….!

पालकमंत्री सावे यांच्या हस्ते राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्य पदक विजेते आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश साबळे यांचा ५ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन बीड, अंबाजोगाई, परळी, गेवराई नगर परिषद आणि कुटे ग्रुप यांच्या वतीने निधी देण्यात आला. आंतरराष्ट्रीय राष्ट्रकुल स्पर्धेत यश मिळविणारा बीडचा भूमिपुत्र अविनाश साबळेंचे कौतुक करताना आपल्याला आनंद होत असून, त्यांनी भविष्यात देखील बीड जिल्हा, महाराष्ट्र आणि भारताचे नाव जगात उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा पालकमंत्री सावे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी कुस्तीपटू सोहेल शेख याचाही सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रारंभी दीप प्रज्वलनानंतर देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. पालकमंत्री यांचे स्वागत व सत्कार जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख यांनी केले.

याप्रसंगी दिव्यांग क्रिकेट असोसिएशनच्या वतीने कप्तान अविनाश घुले व संघाचे सदस्य यांनी पालकमंत्री यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी पालकमंत्री सावे यांनी दिव्यांग क्रिकेट स्पर्धांसाठी शुभेच्छा देताना या दिव्यांग क्रीडा स्पर्धांसाठी आपण पाठीशी राहू, असे सांगितले. तसेच, जिल्हा कराटे असोसिएशनच्या वतीने मुस्ताक यांनी, पतंजली योग समितीच्या वतीने जायभाये व ह. भ. प. नखाते महाराज यांनी, जिल्हा तायक्वांदो असोसिएशन, विविध क्रीडा संघटना आदिंच्या वतीने पालकमंत्री यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

एकता दौडसाठी जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, बीड उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर , बीड तहसीलदार सुहास हजारे, जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष वसंत मुंडे, डॉ. विक्रम सारूक यासह विविध सामाजिक संघटना, खेळाडू, नागरिक, विद्यार्थी, शासकीय अधिकारी – कर्मचारी यांचा मोठा सहभाग होता.